Congress Meeting In Delhi Saam Tv
देश विदेश

Maharashtra Politics: काँग्रेस ठोकणार विधानसभेच्या थेट ८४ जागांवर दावा, दिल्लीच्या बैठकीत काय झाली चर्चा? वाचा...

Assembly Election 2024: आज काँग्रेसची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील नेत्यांनी विधानसभेत काँग्रेसला कमीत कमी ८४ जागा मिळाव्यात, अशी मागणी राज्यातील नेत्यांची मागणी वरिष्ठांनसमोर केली

Pramod Subhash Jagtap

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विधानसभा जागावाटपाचा बेसिक फॉर्म्युला वरिष्ठांनसमोर मांडला आहे. काँग्रेसचे १४ खासदार निवडून आले असल्याने त्या मतदार संघातील विधानसभानुसार काँग्रेसला जागा मिळाव्यात, अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी वरिष्ठांनसमोर मांडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेत काँग्रेसला कमीत कमी ८४ जागा मिळाव्यात, अशी मागणी राज्यातील नेत्यांची मागणी वरिष्ठांनसमोर केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यातील या नेत्यांच्या मतावर विचार करणार आहेत.

तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाचा पुढचा निर्णय होणार, असं सूत्रांनी सांगितलं. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील नेत्यांनी आपली भूमिका मांडली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना सूचना दिल्या की, आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच जाहीरनामामध्ये कोणते मुद्दे घेता येतील, यावरही बैठकीत चर्चा झाली, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

दरम्यान, आज इंडिया आगाडीचीही बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राहुल गांधी यांचे नाव प्रोटेम स्पीकर महताब यांना पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

आता हिंदु देवतांचेही 'धर्मांतरण'; काली मातेची केली मदर मेरी

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT