Sonia Gandhi and Mallikarjun Kharge Saam Tv
देश विदेश

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेसनं स्वीकारलं नाही, सांगितलं मोठं कारण

Congress rejected Ram Mandir Pran Pratistha Invitation: काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण स्वीकारलं नाही. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यासाठी कॉंग्रेस नेते सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अयोध्येला जाणार नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Mandir Pran Pratistha Invitation To Sonia Gandhi

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलंय. राममंदिराचा हा कार्यक्रम त्यांनी आरएसएस आणि भाजपचा असल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या अजेंडाचा भाग म्हणून अपूर्ण मंदिराचं उद्घाटन केल्याचा आरोपही भाजपवर त्यांनी केलाय. (latest ram mandir news)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण काँग्रेसने नाकारलं आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलंय. यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. २२ जानेवारीला (Ayodhya) होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.

राजकीय प्रकल्प बनवत असल्याचा आरोप

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या (lord ram) उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं (ram mandir) उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.

रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला

रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) होणार आहे. यात प्रमुख यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत. अभिषेक होण्यापूर्वी एक आठवडा अयोध्येत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री रामजन्मभूमी (Ram Mandir Pran Pratistha) तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे पाहुण्यांची यादी तयार केलीय. पाहुण्यांच्या यादीत जवळपास 150 समाजातील लोकांचा समावेश आहे. या सर्वांना निमंत्रणं मिळाली आहेत, याची खात्री केली जातेय.

सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी व्यस्त

२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान अयोध्येत पंतप्रधानांसह देशातील प्रमुख मान्यवर हजेरी लावणार आहे. त्यासाठी आठवडाभर अगोदरच सुरक्षा व्यवस्थेची चाचणी केली जाणार आहे. १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे या तारखेपासून केवळ सुरक्षा व्यवस्था कडक केली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, यूपीचे राज्यपाल आणि विविध क्षेत्रातील देशातील नावाजलेले सुमारे अडीच हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT