Rahul Gandhi on BJP-RSS saam tv
देश विदेश

Rahul Gandhi: 'गरिबांच्या पोरांना इंग्रजी भाषा यावी, हे BJP-RSS ला नकोय',राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi on BJP-RSS: इंग्रजी भाषिकांना भविष्यात लाज वाटेल आणि भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यावरून प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केलीय.

Bharat Jadhav

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इंग्रजी भाषेवरुन जोरदार टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला. 'भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असं भाजप आणि आरएसएसला वाटतं. परंतु इंग्रजी भाषा हे एक हत्यार आहे, ते साखळदंड तोडण्याचे साधन आहे असं राहुल गांधी म्हणालेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओतून राहुल गांधी म्हणाले की, 'इंग्रजी हे एक पूल आहे. इंग्रजी लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही, तर ती साखदंड तोडण्याचे साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. ही भाषा फक्त रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर आत्मविश्वासही वाढवते, असं राहुल गांधी म्हणाले.

भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांचे पालनपोषण केलं पाहिजे. प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे. जागतिक स्पर्धेत भारताला मजबूत बनवण्याचा आणि देशातील प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हाच मार्ग असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

जर गरीब मुलं इंग्रजी भाषा शिकले तर ते प्रश्न विचारतील. नंतर त्यांच्याशी बरोबरी करतील त्यामुळे गरीब मुलांनी इंग्रजी शिकू नये, असं भाजप आणि आरएसएसला वाटतं असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. इंग्रजी हे एक शस्त्र आहे. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही कुठेही प्रवेश करू शकता. जर तुम्ही इंग्रजी शिकलात तर तुम्ही अमेरिका, जपान आणि इतर कुठेही जाऊ शकता. तुम्ही कुठेही काम करू शकता, असं राहुल गांधी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

अमित शाह काय म्हणाले?

लवकरच भारतात असा काळ येईल जेव्हा इंग्रजी भाषिकांना स्वतःची लाज वाटेल. अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. तुम्ही तुमची संस्कृती, धर्म आणि इतिहास परदेशी भाषेत समजू शकत नाही. आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. २०४७ मध्ये भारत जगात अव्वल स्थानावर येण्यात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT