Amit Shah: इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल; भाषा वाद सुरू असताना अमित शाह यांचं मोठं विधान

Amit Shah Comment On English Speaker: देशात भाषा वाद सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलंय. देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटू लागेल, असं विधान केलंय.
Amit Shah
Amit Shah Comment On English Speakersaam tv
Published On

देशातील काही राज्यात भाषेवरून वाद सुरू आहे, त्याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठं विधान केलंय. शाह यांनी इंग्रजी भाषेला महत्त्व देणाऱ्या लोकांवर टीकास्त्र सोडलंय. आपल्या देशाच्या भाषा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. देशात जे लोक इंग्रजी बोलण्यास प्राधान्य देतात त्यांना पुढे लाज वाटेल असं म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केलीय.

Amit Shah
FASTag Annual Pass: ३००० रुपयांचा वार्षिक FASTag मिळणार; तुमच्या मनातील १० प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

अमित शाह दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय. "या देशातील इंग्रजी भाषिकांना लवकरच लाज वाटेल, अशा समाजाची निर्मिती फार दूर नाहीये. माझा असा विश्वास आहे की आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भारतीय भाषांशिवाय आपण खरे भारतीय होऊ शकत नाही., असं अमित शाह म्हणालेत"

Amit Shah
Raj Thackeray : राज ठाकरेंचं फडणवीस सरकारला आव्हान, हिंदी सक्तीची केली तर...

मोदींनी अमृत काळासाठी पात पणची पायाभरणी केली आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करणे, गुलामगिरीच्या प्रत्येक खुणा दूर करणे, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकतेसाठी वचनबद्ध असणे आणि प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्याची भावना निर्माण करणे. हे पाच व्रत १३० कोटी भारतीयांचे संकल्प बनले आहेत. हेच कारण आहे की २०४७ पर्यंत आपण अव्वल स्थानावर असू आणि या प्रवासात आपल्या भारतीय भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com