PM Candidate OF INDIA Alliance Saam Digital
देश विदेश

PM Candidate OF INDIA Alliance: 'INDIA'चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला?, ममता बॅनर्जींनी मांडलेल्या प्रस्तावाला केजरीवालांनी दिलं समर्थन

Sandeep Gawade

PM Candidate OF INDIA Alliance

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. आघाडी स्थापन झाल्यापासूनची ही चौथी बैठक होती. या बैठकीतून काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे 'INDIA' आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकता, असे संकेत मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांनी समर्थन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

खर्गे यांनी मात्र पंतप्रधानपदाचा चेहरा बनण्यास नकार दिला आहे. मला फक्त वंचितांसाठी काम करायचं आहे. आधी निवडणुकीत विजय मिळवू नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येईल, असं खर्गे यांनी म्हटलं आहे. दलित चेहरा असल्यामुळे त्यांच नाव पुढे आलं होतं, मात्र त्यांच्या नावाला एकमत नसल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आजच्या बैठकीत, जागावाटपाचा फॉर्म्युला, आघाडीचे समन्वयक, निवडणूक अजेंडा आणि निवडणूक व्यवस्थापनावर चर्चा झाली. मात्र बैठकीत कोणत्याही मुद्द्यावर अंतिम चर्चा झालेली नाही. टीएमसीसह आघाडीच्या अनेक पक्षांनी जागावाटपासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे.

आजच्या बैठकीत आघाडीतील २८ पक्ष सहभागी झाले होते. प्रत्येक पक्षाने आपलं म्हणणं मांडलं. जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र कसं काम केलं पाहिजे, कोणता मुद्दा मांडला पाहिजे यावर चर्चा झाली. ही चौथी बैठक होती, तर देशात किमान १० बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती खर्गे यांनी दिली.

भाजपच्या काळात देशाच्या संसदेतून खासदारांना निलंबित केलं जात असून हे लोकशाही विरोधी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे, त्यासाठी तयार रहा. २२ डिसेंबर रोजी देशभरात याचा निषेध करण्यात येणार आहे, असल्याच ते म्हणाले. मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाच्या प्रस्तावावर खर्गे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT