राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आलेत. चारपैकी तीन राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
निवडणुकीत कॉंग्रेसला तेलंगणा वगळता एकाही राज्यात आपली सत्ता टिकवता आली नाही. या मानहानीकारक पराभवानंतर विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीमध्येही हालचाली वाढल्यात. काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुढील वर्षी होणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत आघाडीची बैठक बोलावली आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) ६ डिसेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत संपूर्ण घटक पक्षांऐवजी समन्वय समितीमध्ये समाविष्ट पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक ही पाटणा येथे झाली होती. नंतर बंगळुरू आणि मुंबई येथे या बैठका झाल्या. आता दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ही बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ६ डिसेंबरला या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) अटीतटीची लढत होईल, ज्यामध्ये २ राज्यांमध्ये कॉंग्रेसचा २ राज्यात विजय होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र या तिनही राज्यात भाजपने (BJP) मुसंडी मारत कॉंग्रेसला मोठा धक्का दिला. फक्त तेलंगणामध्ये कॉंग्रेसला सत्ता मिळवता आलीय. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.