Shashi Tharoor On BJP Joining: India Today
देश विदेश

Shashi Tharoor: शशी थरूर भाजपात जाणार? राजकीय वावड्यांवर काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा

Shashi Tharoor On BJP Joining: काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे पक्षासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्याकडे इतरही पर्याय असल्याचे वक्तव्य केलं होतं.

Bharat Jadhav

देशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चांनुसार खासदार शशी थरूर काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राहुल गांधी हे थरूर यांना साईडलाईन करत असल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. या राजकीय वावड्यांदरम्यानच शशी थरूर यांचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला. या फोटोने अफवांना अजून पेव फुटले. थरूर हे तिरुअनंतपुरममधून चारवेळा खासदार राहिलेत. आता तेच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यावर त्यांनी स्वत: नीच पडदा टाकलाय. पक्ष सोडण्याच्या चर्चा ह्या अफवा असल्याची माहिती शशी थरूर यांनी दिलीय.

शशी थरूर यांनी एका वृ्त्तसंस्थेशी बोलताना चर्चांबाबत खुलासा केलाय. थरूर यांनी वैचारिक मतभेदांचा हवाला देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. 'नाही, प्रत्येक पक्षाची स्वतःची श्रद्धा आणि इतिहास असतो. जर तुम्ही त्यांचा विश्वास स्वीकारू शकत नसाल तर इतर पक्षात सामील होणे योग्य नाही. मला ते योग्य वाटत नाही. पण स्वतंत्र राहण्याचा पर्याय नेहमीच असतो'.

आजच्या काळात पक्ष हे एक माध्यम आहे ज्याला ते मूल्ये पुढे नेण्यासाठी संघटनात्मक ताकद बाळगण्याची गरज आहे,” असं शशी थरूर म्हणाले. मी नेहमीच एक पारंपरिक उदारमतवादी राहिलोय. आपण सांप्रदायिकतेचा विरोध करतो आणि आर्थिक विकासासोबतच सामाजिक न्यायावरही विश्वास ठेवतो.’ असं म्हणत शशी थरूर यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपने राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवलीय, जी आम्ही दाखवू शकलो नाही. केरळमध्येही सीपीआयएमने गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांची क्षमता दाखवली आहे, हे मला सांगण्यात किंवा दाखवण्यात काही गैर वाटत नाही. आम्ही केडर आधारित पक्ष नाही. आपल्याकडे अनेक नेते आहेत पण कार्यकर्त्यांची कमतरता आहे. काँग्रेसमध्ये पक्षाच्या अंतर्गत संघर्षाबाबत बोलतांना थरूर म्हणाले की, माझ्या स्वतःच्या पक्षात काही लोक नक्कीच माझा विरोध करतात, पण मी भारत आणि केरळच्या भविष्यासाठी नेहमी माझे विचार मांडतो.’ पण त्याचबरोबर भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याच्या गोष्टीला आपला विरोध आहे. हे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे,” थरूर असंही म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT