Vinay Kulkarni Gets Life Imprisonment in BJP Leader Murder Case saam tv
देश विदेश

BJP Leader Killing Case : भाजप नेत्याची हत्या; काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा

Congress MLA Vinay Kulkarni gets life imprisonment : भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जून २०१६ मध्ये धारवाडच्या भाजप जिल्हा परिषद सदस्य गौदार यांची जीममध्ये हत्या झाली होती.

Nandkumar Joshi

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस आमदार विनय कुलकर्णीला (Vinay Kulkarni Gets Life Imprisonment ) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेस आमदार कुलकर्णी यांच्यासह या हत्येत सामील असलेल्या अन्य १६ जणांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जून २०१६ मध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं हा निकाल दिला.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी सीबीआयच्या मागणीनंतर आरोपी आमदार कुलकर्णी आणि इतर साथीदारांना या निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवलं. तत्पूर्वी सीबीआयने या हत्या प्रकरणात आणि कट रचल्याच्या आरोपाखाली संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती कोर्टात केली होती. तर कुलकर्णी याला सामाजिक सेवा, राजकीय पार्श्वभूमी, मुलं आणि कुटुंबातील इतर सदस्यांची जबाबदारी असल्यानं कुलकर्णी याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • २०१६ मध्ये भाजप नेता गौदार (BJP leader Yogeshgouda Goudar killed) यांची हत्या झाली. १५ जून २०१६ रोजी धारवाडच्या भाजप जिल्हा परिषद सदस्य गौदार यांची त्यांच्या जीममध्ये हत्या करण्यात आली होती.

  • त्यावेळी राज्यात मंत्री असलेल्या विनय कुलकर्णी यांच्यावर त्यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता.

  • सीबीआयच्या माहितीनुसार, गौदार यांच्यावर धारवाडमधील सप्तपूर येथील जीममध्ये हल्लेखोरांकरवी हल्ला करण्यात आला होता. यात त्यांचा मृत्यू झाला होता.

  • काँग्रेस आमदाराचं नाव या हत्या प्रकरणात समोर आलं. त्यावरून कर्नाटकातील राजकारण तापलं होतं.

  • गौदार यांच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून तत्कालीन भाजप सरकारनं २०१९ मध्ये हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं.

  • सीबीआयनं या प्रकरणात २०२० मध्ये आरोपपत्र दाखल केलं. त्यात कुलकर्णी हा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

  • गौदार हे उदयोन्मुख राजकारणी होते. त्यांच्याकडे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून बघितले गेले. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती.

  • कुलकर्णीला सीबीआयने २०२० मध्ये अटक केली. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्थींवर कुलकर्णीला जामीन दिला. धारवाडमध्ये त्यांना प्रवेशबंदी होती.

  • जून २०२५ मध्ये तक्रारदार पक्ष आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांनंतर सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णीचा जामीन रद्द केला होता.

  • २०२६ मध्ये कुलकर्णीने पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. मात्र, उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला. सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारीला कुलकर्णीला जामीन दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Battery Damage: फास्ट चार्जिंग होणाऱ्या फोनची बॅटरी लगेच खराब होते का? वाचा सत्य

Shocking : नवरा नाईट ड्युटीवर, घरी सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ ; खुलताबादमधील धक्कादायक घटना

Who Is Nida Khan: नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कोण आहे?

महाराष्ट्रात मोठा उलटफेर होणार? भाजप नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? पडद्यामागं काय आहे चर्चा?

Maharashtra News Live Update: पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन

SCROLL FOR NEXT