काँग्रेस आमदारावर पुन्हा लैंगिक छळाचे आरोप
व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
काँग्रेसने तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झालेत. लैंगिक छळाच्या आरोपांमुळेचं त्यांचे काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. आता परत त्याचे चॅट व्हायरल झालेत. आता परत एकदा राहुल ममकुटाथिल यांची नवीन व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट आणि ऑडिओ क्लिप समोर आलीय. दरम्यान त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
समोर आलेली कथित ऑडिओ क्लिप राहुल आणि एका महिलेमधील संभाषण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांतील अडचणी सांगते. त्यावर राहुलने तिला रुग्णालयात जाण्यास सांगितलं. महिला राहुल ममकुटाथिल यांना म्हणते की,तू बदलला आहेस. तुलाच तर बाळ हवं होतं. अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. दरम्यान या ऑडिओ आणि चॅटची अद्याप पुष्टी झालेली नाही.
तसेच त्या महिलेचा आणि काँग्रेस आमदाराची एक चॅटचा स्क्रीनशॉट सुद्धा व्हायरल झालाय. यात कॉग्रेस आमदार महिलेला म्हणतात की 'मला तुला प्रेग्नेंट करायचे आहे, मला आपलं मूल हवं." दरम्यान, राहुल ममकुटाथिल यांनी सोमवारी सांगितले की, या व्हायरल चॅट आणि ऑडिओ क्लिप आपली नाही. त्याचा तपास करण्यात येईल आणि आरोपांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. आधीच्या प्रकरणाची तपासी केली जात आहे.
त्यात आपण पूर्ण सहकार्य करत आहेत, अशी माहिती काँग्रेस आमदाराने दिलीय. याआधी या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात एका मल्याळम अभिनेत्री आणि लेखिकीनं काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. त्यानंतर पक्ष श्रेष्ठींनी त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केलं होतं. आरोपानंतर राहुल ममकुटाथिल यांनी युवा काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.