तरूणीच्या गळ्यावरून चाकू फिरवला; घरात रक्ताचा सडा, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं, कारण काय?

Man Kills Girlfriend With Cutter: लखनऊच्या मोहनलालगंजमध्ये वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. जखमी अवस्थेत प्रेयसी खाली कोसळली. लग्नाला नकार दिल्यानं आरोपीनं संतापून प्रेयसीला संपवलं.
Man Kills Girlfriend With Cutter
Man Kills Girlfriend With CutterSaam
Published On

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मोहनलालगंजच्या धर्मवतखेडा गावात एका प्रमीयुगुलानं घरात घुसून कटरने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास करून आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. मतभेदाच्या कारणामुळे आरोपीनं गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं उघड झालं.

धर्मवतखेडा गावातील रहिवासी पूनम रावत एका खासगी रूग्णालयात कार्यरत आहेत. रविवारी दुपारी पूनम कामावर गेली होती. तिची मोठी मुलगी प्रियांशी (१९) आणि धाकटी मुलगी मेहक घरी होती. दुपारच्या सुमारास आलोक रावत तिच्या घरी आला. आरोपीनं मेहकला प्रियांशीबद्दल विचारणा केली. तो प्रियांशीला शोधत पहिल्यावर मजल्यावर गेला. या दरम्यान, गर्लफ्रेंडसोबत त्याचा वाद झाला. आरोपीनं कटर घेऊन प्रियांशीच्या मानेवर वार केले.

Man Kills Girlfriend With Cutter
भाजपमध्ये भूकंप! ५० बड्या नेत्यांचा सामूहिक राजीनामे, कारण काय? नाशिकमध्ये खळबळ

रक्ताने माखलेली प्रियांशी ओरडत पायऱ्या उतरत धावली. खाली येऊन कोसळली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियांशीची आई पूनम यांच्या म्हणण्यानुसार, प्रियांशीचे आलोकसोबत प्रेमसंबंध होते. त्यानं प्रियांशीला लग्नाची मागणी घातली.

बहीण मेहकनं दिलेल्या माहितीनुसार, आलोक घरी येऊ लागला. प्रियांशीवर दारूच्या नशेत मारहाण करू लागला. प्रियांशीने आलोकच्या मारहाणीला कंटाळून लग्न करण्यास नकार दिला. यामुळे आलोक संतापला. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, प्रियांशीने नकार दिला. याच रागातून आलोकनं प्रियांशीला संपवलं.

Man Kills Girlfriend With Cutter
कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

एसीपी मोहनलालगंज विकास पांडे यांनी सांगितले की, तपासादरम्यान, रक्ताने माखलेले कटर सापडला आहे. फॉरेन्सिक टीमने अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपी आलोकला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

Man Kills Girlfriend With Cutter
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, पोलिसांकडून मशीन - गोळ्या जप्त, डॉक्टर फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com