Congress Manifesto 2024 :  Saam tv
देश विदेश

Congress Manifesto 2024 : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर; 5 न्यायसहित दिल्या २५ गॅरंटी

Lok Sabha Election News : काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात ५ न्याय आणि २५ गँरंटीचा समावेश आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते उपस्थित होते.

Vishal Gangurde

congress manifesto 2024 :

लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केली आहेत. तर काही उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात केली आहे. याचदरम्यान, काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटीचा समावेश आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणत्या योजनांचा समावेश आहे?

काँग्रेसने जाहीरनाम्यात देशातील युवा, गरीब कुटुंब, मजूर , महिला इत्यादी वर्गासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारमध्ये ३० लाख नोकरी, गरीब कुटुंबातील महिलांसाठी वर्षाला एक लाख रुपये, जातीनिहाय जनगणना, एमएसपी कायद्याला दर्जा, मनरेगा योजनेअंतर्गत ४०० रुपये, तपास यंत्रणांचा गैरवापर रोखणे, PMLA कायद्यात बदल, सच्चर कमिटीच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसच्या माहितीनुसार, या जाहिरनाम्यात पाच न्यायाचा समावेश आहे. त्यात भागीदारी न्याय, शेतकरी न्याय, नारी न्याय, श्रमिक न्याय, युवा न्याय आहेत. तसेच काही गॅरंटी देखील दिल्या आहेत. केंद्र सरकारमध्ये ३० लाख नोकऱ्या, युवकांना एका वर्षासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १ लाख देण्याचं आश्वासनाचा समावेश आहे.

काँग्रेसने जाहीरनाम्यात काय गॅरंटी दिली?

काँग्रेसने 'भागीदारी न्याय' अंतर्गत जातनिहाय जनगणना करणे आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची गॅरंटी दिली आहे. पक्षाने 'शेतकरी न्याय' किमान आधारभूत किंमतीला कायद्याचा दर्जा देणे, कर्जमाफी योजना , जीएसटी मुक्त शेतीचे आश्वासन, काँग्रेसने श्रमिक न्याय अंतर्गत मजुरांना आरोग्याचा अधिकार देणे, किमान वेतन दराच्या अंतर्गत दिवसाला ४०० रुपये मजुरी निश्चित करणे, शहरात रोजगाराची गॅरंटी दिली आहे. तसेच 'नारी न्याय' म्हणजे महालक्ष्मी गॅरंटी अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना एक-एक लाख रुपये प्रत्येक वर्षाला देण्याचे आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT