Konkan Politics : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : नितेश राणेंचं वैभव नाईक, विनायक राऊतांना समाेरासमाेर येण्याचे आव्हान

Nitesh Rane Latest Marathi News : नितेश राणे म्हणाले विनायक राऊत यांच्या प्रत्येक खळा बैठकीत 7 पेक्षा जास्त लोक नसतात. चार जूनला राऊत यांना जनता उत्तर देईल असेही राणेंनी नमूद केले.
nitesh rane criticises vinayak raut and vaibhav naik  ratnagiri sindhudurg lok sabha election
nitesh rane criticises vinayak raut and vaibhav naik ratnagiri sindhudurg lok sabha electionsaam tv
Published On

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवारा बाबत सगळा संभ्रम आज किंवा उद्या दूर हाेईल असा विश्वास व्यक्त करत आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. चार जूनला राऊत यांना जनतेनेच त्यांना उत्तर दिले असेल असेही राणेंनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार निलेश म्हणाले राणे साहेबांनी सिंधुदुर्ग मध्ये काय दिलं ह्याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर या असे आव्हान राणेंनी दिले. विकास कामे अडविण्याचा काम विनायक राऊत यांनी केले आहे. विकासावर चर्चा करू असेही राणेंनी म्हटले. राणे म्हणाले विनायक राऊत यांच्या प्रत्येक खळा बैठकीत 7 पेक्षा जास्त लोक नसतात. चार जूनला राऊत यांना जनता उत्तर देईल असेही राणेंनी नमूद केले.

nitesh rane criticises vinayak raut and vaibhav naik  ratnagiri sindhudurg lok sabha election
Raju Shetti : उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये देऊ केलेली उमेदवारी राजू शेट्टींनी नाकारली,कारण ही सांगितलं

राणे सामंतांची कौटुंबिक भेट

सामंत कुटुंब व राणे कुटुंब यांचे राजकारणा पालिकडचे संबंध आहेत. दाेन्ही नेत्यांची कौटुंबिक भेट झाली असेल. जसे राणे साहेबांना आम्ही दाेघे मुलं आहाेत तसे उदय आणि किरण आहेत असेही नितेश राणेंनी मंत्री नारायण राणे -सामंत भेटीविषयी नमूद केले.

वैभव नाईक यांना कुडाळमधूनच उत्तर मिळेल

किरण सामंत हा सरळ मनाचा माणूस आहे. त्यांनी कोणत्या भावनेत ते ट्विट केलं हे आपण समजू शकत नाहीत. त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊन त्यांच्या सोबत आहोत. त्यांना कोणीही एकट पाडू शकत नाहीत. परंतु आमदार वैभव नाईक यांचा जाे धंदा आहे ताे सुरुच आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी राणेंच नाव घेतलं नाही तर त्यांना मातोश्रीचा पगार मिळणार नाही अशी टीका राणेंनी नाईकांवर केली. कुडाळ मध्ये मिळणारे मताधिक्य हेच वैभव नाईक यांना उत्तर मिळेल असेही नितेश राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane criticises vinayak raut and vaibhav naik  ratnagiri sindhudurg lok sabha election
Kolhapur Crime News : शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com