Pappu Yadav : माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक; बिहारमध्ये अपक्ष उमेदवार भाषणादरम्यान ढसाढसा रडला

Pappu Yadav cry on stage : काँग्रेसमधील नाराज नेते पप्पू यादव हे दुचाकीवरून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचत अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत पप्पू यादव स्टेजवर भाषणादरम्यान ढसाढसा रडले.
pappu yadav
pappu yadavSaam tv

Pappu Yadav purnia constituency :

काही दिवसांपूर्वी पक्षासहित काँग्रेसमध्ये सामील झालेले माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी गुरुवारी बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. काँग्रेसमधील नाराज नेते पप्पू यादव हे दुचाकीवरून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचत अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत पप्पू यादव स्टेजवर भाषणादरम्यान ढसाढसा रडले. 'माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक होत आहे, असा आरोपही पप्पू यादव यांनी केला.

'मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत राहील'

पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. 'मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत राहील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले होते. पूर्णियातून अपक्ष लढण्यासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पप्पू यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.

pappu yadav
Today's Marathi News Live: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी

'मला काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी स्वतंत्र उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार आहे. अनेकांनी माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न केला. पूर्णियाची जनता ही मला नेहमी जाती-धर्मापेक्षा मोठी आहे. मला 'इंडिया आघाडी' मजबूत करायची आहे. माझा निश्चय आहे की, राहुल गांधी यांना मजबूत करायचं आहे. मी केवळ पूर्णियाच्या लोकांसाठी निवडणूक लढत आहेत, कारण येथील जनतेची इच्छा आहे. मी नेहमी पूर्णिया, सीमांचल आणि बिहारमधील लोकांच्या कल्याणासाठी लढत राहील, असे पप्पू यादव म्हणाले.

pappu yadav
NCP Symbol Dispute : ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हाचा वाद कोर्टात; दोन्ही गटांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

तत्पूर्वी, १९९० या दशकात पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून पप्पू यादव यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. पप्पू यादव यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com