Today's Marathi News Live: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी

Maharashtra Latest News and Update in Marathi (4 april 2024): राज्यातील आणि देशातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Aajchya Marathi Batmya Live - 4 April 2024 | Latest Updates on  IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live - 4 April 2024 | Latest Updates on IPL, Lok Sabha Election, PM Narendra Modi and overall MaharashtraSaam TV

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स आता संपला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर कल्याणमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सी पी टँक परिसरात दुकानाला आग, चार वाहने जळून खाक

आगीत दुकानासह दोन गाड्या आणि दुचाकी जाळून खाक

तीन फायर इंजिन आणि दोन टँकर घटनास्थळी

अगीच कारण अद्याप अस्पष्ट

हिंगोलीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता, रामदास पाटील सोमठाणकर यांनी भरला अपक्ष फॉर्म

हिंगोलीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता

भाजप नेते रामदास पाटील सोमठाणकर यांनी भरला अपक्ष फॉर्म

रामदास पाटील सोमठाणकर हे हिंगोलीचे आहेत समन्वयक त्यांनीच उमेदवारी दाखल केली

भाजप नेते रामदास पाटील सोमठाणकर सध्या नॉट रीचेबल

संजय राऊत यांचा उद्या सांगली लोकसभेचा दौरा

संजय राऊत उद्या सकाळी ९ वाजता सांगलीच्या दिशेने रवाना होणार तर १० वाजता सांगली येथे संजय राऊत यांच जोरदार स्वागत ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच देखील उद्घाटन होणार आहे .