Devendra Fadnavis Saam Tv
देश विदेश

Devendra Fadnavis: काँग्रेस नेते 'गजनी' सारखे, निवडणुकीनंतर आश्वासने विसरतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis News: 'काँग्रेस नेते 'गजनी' सिनेमातील विसरभोळ्या पात्रासारखे आहेत. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासने विसरून जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis News:

'काँग्रेस नेते 'गजनी' सिनेमातील विसरभोळ्या पात्रासारखे आहेत. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासने विसरून जातात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मध्य प्रदेशातील विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आज शनिवारी मध्य प्रदेशातील बुरहानपूर मतदारसंघातील भाजप उमदेवार अर्चना चिटणीस यांच्या प्रचारसभेला देवेंद्र हजेरी लावली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राहुल गांधी आणि प्रियंका गांधी येऊन घोषणा करून जातात. कमलनाथ देखील फक्त आश्वासने देतात. त्यांना विचारा की, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली का? त्यांना विसरण्याचा आजार आहे. तुम्ही 'गजनी' सिनेमा पहिलात का? काँग्रेसला 'गजनी' आजार झाला आहे'.

'काँग्रेस नेते जाहीरनाम्यातून मोठंमोठी आश्वासने देतात. मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर विसरून जातात. ते फक्त त्यांच्या कुटुंबाचा विचार करतात. ते गोर-गरीब जनतेचा विचार करत नाही. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्य आणि गरीबांच्या भवितव्याचा विचार केला जातो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'अन्न, वस्त्र आणि निवारा' या बद्दलची आश्वासने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या सरकारकडूनही देण्यात आली. मात्र, हे सर्व आश्वासने केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पूर्ण झाली, असे फडणवीस म्हणाले.

'गेल्या ९ वर्षांत गरीबांना पाच कोटी गरीबांना पक्के घरे मिळाली. तर गरीबांना वीज मिळाली. तसेच अन्य सुविधा सरकारने दिल्या, असा दावा फडणवीस यांनी केला.

'त्यांनी प्रत्येक घरात पाणी पुरवठा करणाऱ्या नळाची सुविधा, मोफत आरोग्य सुविधेसाठी आयुष्यमान योजना आहे. तसेच मध्य प्रदेशमधील पाच कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आलं आहे, असाही दावा फडणवीस यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT