UP ATS Action: पुणे मॉड्यूलशी संबंधित इसिसच्या ४ दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशात अटक, ३ जण आहेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी

ISIS Terrorists : उत्तर प्रदेश एटीएस पथकाने इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय.
ISIS Terrorists
ISIS Terrorists संग्रहित छायाचित्र

UP ATS Arrested 4 ISIS Terrorists :

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवाद्यांना अटक केलीय. यातील तिघेजण हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे (एएमयू) विद्यार्थी होते. एटीएसने ५ नोव्हेंबर रोजी या इसिस संघटनेचा दहशतवादी अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक यांना अलीगढ येथे अटक केली होती. त्यानंतर एटीएसने त्यांच्या इतर सक्रिय साथीदारांचा शोध सुरू केला. या शोध मोहिमेत एटीएसने सक्रिय सहकारी वजिहुद्दीन याला छत्तीसगडमधून अटक केली. एटीएसकडून पुणे मॉड्यूलशी संबंधित या दहशतवाद्यांच्या इतर काही साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. (Latest News)

इसिसचे दहशतवादी रकीब इमाम अन्सारी, ( भदोही), नावेद सिद्दीकी, (संभळ) , मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझिम अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचं विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले. दहशतवादी रकीब इमामने बी टेक, आणि एम टेकची पदवी घेतलीय. तर नोमानने बीए केलं आहे. नोमानच्या मदतीने नाजिम हा इसिसच्या मॉड्यूलच्या संपर्कात आला होता. या तिघांचे एएमयूच्या स्टुडंट्स ऑफ अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंध आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या एटीएस पथकाने या दहशतवाद्यांना अटक केलीय. त्यातील अधिकारी एडीजी एटीएस मोहित अग्रवाल यांनी याप्रकरणात विस्तृत माहिती दिली. त्याच्या माहितीनुसार, रबिकला शुक्रवारी अलीगढमधून तर नावेद, नोमान आणि नाजिम यांना शनिवारी संभल येथून पकडण्यात आले. हे चौघेही इसिसमध्ये सामील होऊन दहशतवादी घटना घडवण्याच्या कटात सामील होते.

दरम्यान एटीएस त्याच्या इतर काही साथीदारांचाही शोध घेत आहे. हे दहशतवादी जिहादविषयी काही कारस्थाने करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक तरुणांना जिहादसाठी प्रवृत्त करत. तसेच तरुणांना गुप्त ठिकाणी दहशतवादी प्रशिक्षणही देत ​​होते.

उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे कट रचले जात होते. हे चारही आरोपींना पोलीस कोठडीत घेण्याची तयारी एटीएस करत आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अब्दुल्ला आणि तारिक यांना पोलीस कोठडीत घेऊन एटीएसकडून त्यांची चौकशी केली जात आहे. या दोघांकडून अनेक गुपितेही उघड झाली असून, त्याआधारे पुढील तपास सुरू आहे.

ISIS Terrorists
Pune News: ISIS दहशतवादी मॉड्युल प्रकरणात 7 जणांवर आरोपपत्र दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com