काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी (20 फेब्रुवारी 2024) राजस्थानमधून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड निवडून आले आहेत. विधानसभेचे प्रधान सचिव आणि राज्यसभेचे निवडणूक अधिकारी महावीर प्रसाद शर्मा यांनी सांगितले की, राजस्थानमधून राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी तीन जागांवर तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत
राजस्थानमधून 2024 च्या राज्यसभा निवडणुकीसाठी (RajyaSabha Election) तीन जागांवर तीन उमेदवार निवडून आले आहेत. मंगळवारी राजस्थान विधानसभेचे प्रधान सचिव आणि राज्यसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी महावीर प्रसाद शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठौर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी यांना निवडून आल्याची घोषणा केली.
सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या वतीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी त्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र घेतले. बहुमतानुसार येथील निवडणूक बिनविरोध होणे निश्चित होते. आतापर्यंत सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवूनच संसदेत पोहोचल्या होत्या, त्या पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या जागी राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली आहे. तसेच भाजपने आपल्या माजी आमदारांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यापैकी चुन्नीलाल गार्सिया हे एसटीतून तर मदन राठोड हे ओबीसीमधून आले आहेत. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या इतर तीन उमेदवारांना मंगळवारी गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.