Sam Pitroda Statement Saam TV
देश विदेश

Sam Pitroda Statement : दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात; सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने खळबळ

Sam Pitroda News: देशाच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांनी भारतीयांची तुलना थेट चिनी, अरब, आफ्रिकन लोकांशी केली आहे.

Satish Daud

मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. देशाच्या विविधतेबद्दल बोलताना पित्रोदा यांनी भारतीयांची तुलना थेट चिनी, अरब, आफ्रिकन लोकांशी केली आहे. भारताच्या पूर्वेकडील भागात राहणारे लोक चिनी लोकांसारखे दिसतात, असं पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन, तर पश्चिमेकडील लोक अरबी दिसतात. उत्तर भारतीय गोरे दिसतात, असं वक्तव्यही पित्रोदा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वादंग उठण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सॅम पित्रोदा यांनी वारसा करावर भाष्य केले होते. यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता.

नेमकं काय म्हणाले सॅम पित्रोदा?

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी नुकतीच 'द स्टेट्समन' या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. "आम्ही भारतीय जगातील लोकशाहीचे एक ज्वलंत उदाहरण आहोत. आम्ही भारतासारखा वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकतो, जिथे पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबसारखे दिसतात", असं पित्रोदा यांनी म्हटलंय.

"उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. परंतु याने काही फरक पडत नाही, आम्ही सर्व बहिण-भाऊ आहोत, असं वक्तव्यही पित्रोदा यांनी केलं आहे. भारतातील विविध प्रदेशातील लोकांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ, धर्म, भाषा भिन्न आहेत, परंतु भारतातील लोक एकमेकांचा आदर करतात", असंही ते म्हणाले.

दरम्यान, पित्रोदा यांच्या या विधानावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला आहे. "सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि मी भारतीयासारखा दिसतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. आपण भिन्न दिसू शकतो, परंतु आपण सर्व एकच आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या", असंही आसामचे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

Shravan 2025: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Bollywood Celebrities Restaurants : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या 'या' रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कधी गेलाय का?

SCROLL FOR NEXT