नवी दिल्ली : क्वादिमीर पुतीन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. पुतीन यांनी पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पाश्चिमात्य देश आणि युद्धावर मोठं भाष्य केलं आहे. 'मला विश्वास आहे की, आपण या कठीण काळातून बाहेर पडू आणि अधिक मजबूत होईल. विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत. त्या पूर्ण करू, त्याबाबत शंका नाही, असं वक्तव्य पुतीन यांनी केलं.
पुतीन यांनी पुढे म्हटलं की, 'रशियाच्या नागरिकांना दुजोरा दिला आहे की, देश योग्य मार्गावरून चालला आहे. आता अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. तुम्ही आपल्या ऐतिहासिक लक्ष्य गाठण्याबाबत जागरुक आहात. तुम्ही मातृभूमीसाठी एकजूट होऊन मला निवडलं आहे'.
पुतीन यांनी युद्धात लढणाऱ्या रशियन सैनिकांच्या आठवणीत म्हटलं की, 'मी विनम्रपणे सैनिकांचा आदर करतो. मातृभुमीसाठी लढणाऱ्यांचाही आदर करतो. यावेळी पुतीन यांनी भाषणादरम्यान, देशाची सेवा, सुरक्षा, एकता आणि समर्पण यावर भाष्य केलं.
'माझ्यावर विश्वास व्यक्त करत संविधानामार्फत राष्ट्राध्यक्षपदाच्या रुपात मला शक्ती दिली आहे. मी सर्वकाही करायला तयार आहे, जे मला शक्य आहे, असे ते पुढे म्हणाले.
'आपण एकजूट असून एका महान देशाच्या स्वरुपात उभे आहोत. आपण सर्व मिळून अडथळे दूर करू. आपण ज्या विचार करत आहोत, तो सत्यात आणण्याचा विचार करू. आपण सर्व एकत्र जिंकू. आपल्याला सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. जगातील सर्व देश रशियाला विश्वासार्ह आणि प्रामाणिक देश म्हणून मानतात, असे ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.