Rahul Gandhi News Update SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News: 'हरियाणाचा निकाल अनपेक्षित...', अखेर राहुल गांधी बोलले; काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितलं

Gangappa Pujari

दिल्ली, ता. ९ ऑक्टोबर

हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत विधानसभेच्या 90 जागांपैकी ४८ जागा जिंकल्या तर काँग्रेसचे 37 आमदार निवडून आले. या पराभवानंतर काँग्रेसवर विशेषता राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. निकाल लागल्यानंतर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रियाही आली नव्हती. अखेर आता १२ तासानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभेच्या निकालावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल येताच काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हरियाणाचा पराभव काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक निकालानंतर राहुल गांधी माध्यमांसमोर आले नव्हते तसेच त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रियाही दिली नव्हती. अखेर हरियाणातील निकालावरुन 24 तासांनंतर राहुल गांधींनी मौन सोडले असून हरियाणाचा निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे, तसेच प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत राहुल गांधींनी आपल्या एक्स माध्यमावर ट्वीट केले आहे.

"जम्मू आणि काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार. राज्यातील भारताचा विजय हा संविधानाचा विजय आहे. लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे. असं ते म्हणालेत. तर आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला देणार आहे. त्यांच्या पाठिंब्याबद्दल हरियाणातील सर्व लोकांचे आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक आभार. हक्कासाठी, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी, सत्यासाठी आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज उठवत राहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये हॅट्रिक साधल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. या निकालानंतर भाजपने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. हरियाणा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी जिलेबीचा उल्लेख करत भाजपवर टीका केली होती, याचेच प्रत्यूत्तर म्हणून आता निकालानंतर भाजपने त्यांच्या बंगल्यावर जिलेबीचा बॉक्स पाठवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: महाविकास आघाडी टिकणार नाही; हरियाणाच्या निकालावरून शिरसाट यांचं मविआवर शरसंधान

Joe Root: जो रुट बनला इंग्लंडचा 'ऑल टाईम ग्रेट' बॅट्समन! दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे

Marathi News Live Updates: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची हजेरी

Flipkart Sale सुरु! अवघ्या ७ हजार रुपयांत टीव्ही आणि वॉशिंग मशीन, जाणून घ्या सर्व ऑफर

Health Tips: नखं पिवळी पडत असतील तर वेळीच व्हा सावधान, असू शकतात हा आजार

SCROLL FOR NEXT