Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, भरधाव दुचाकी एसटी बसला धडकली; तिघांचा जागीच मृत्यू

Buldhana Chikhali Accident News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
Buldhana Accident
Buldhana AccidentSaam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या वरदडा फाट्यावर मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली. मृत तरुण हे चिखली तालुक्यातील रहिवासी होते.

Buldhana Accident
Kalyan News : गरबा बघण्यासाठी ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला; विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

गोपाल सुरडकर, धनंजय ठेंग, सुनील सोनुने अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. घटनेचा पंचनामा करून तिन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन तरणीबांड पोरांचा अपघातात मृत्यू झाल्याने चिखली तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यात राहणारे तीन तरुण काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा ते चिखली ते मेहकर मार्गावरून दुचाकीने प्रवास करीत होते. त्याचवेळी वरदडा फाट्यावर एसटी बस बंद पडलेल्या अवस्थेत उभी होती.

दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणांना रात्रीच्या अंधारात एसटी बस दिसली नाही. त्यामुळे काही समजण्याच्या आतच दुचाकी एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जळगावात शिवशाही बस-कारचा भीषण अपघात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा धरणगाव रस्त्यावर शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात झाला. सूतगिरणी जवळ सोमवारी रात्री शिवशाही बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या निजामपूर येथील असल्याची माहिती. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Buldhana Accident
Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com