Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Disqualified: राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राहुल गांधींची खासदारकी रद्द

Rahul Gandhi Convicted in Defamation Case: राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi News: काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

कालच राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव'वरून वादग्रस्त विधान केले होते. मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले होते. (Latest Marathi News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का? असं वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.

Letter

लोकसभा सचिवालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ते लोकसभेच्या खासदारकीसाठी अपात्र ठरले आहेत. ही अपात्रता त्याच्या दोषी ठरल्याच्या दिवसापासून म्हणजेच 23 मार्च 2023 पासून लागू होईल. राज्यघटनेच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

अंडे खाणार, कॅन्सर होणार? अंड्यांमध्ये बंदी असलेलं घातक रसायन?

Stale Chapati: रात्रीच्या शिळ्या चपात्यांना नवा ट्विस्ट; सकाळी मस्त बनवा मस्त टेस्टी नाश्ता

Peru Benefits: हिवाळ्यात भाजलेला पेरू खाल्ल्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

SCROLL FOR NEXT