rahul gandhi news Saam tv
देश विदेश

देशात आर्थिक संकट, पंतप्रधान परदेशात चॉकलेट वाटत फिरताहेत; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

rahul gandhi on narendra modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशात आर्थिक संकट असताना पंतप्रधान परदेशात चॉकलेट वाटत फिरताहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली.

Vishal Gangurde

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावरून राहुल गांधी यांची टीका

देश आर्थिक संकटात असल्याचा केला आरोप

विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीत आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' चॉकलेट गिफ्ट दिलं. मात्र, देशात आर्थिक संकट असताना चॉकलेट गिफ्ट देताय, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान देशातील आर्थिक स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, 'शेतकऱ्यांना खत मिळणार नाही, त्याची तयारी आतापासून करा. भारतातील तेल दुसऱ्या देशात निर्यात केलं जात आहे. कोट्यवधी रुपयांचं तेल दुसऱ्या देशात जात आहे. ते तेल भारताला हवंय. ते तेल भारतात राहणाऱ्या लोकांना हवंय.

'मी मागच्या बैठकीत म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे संविधानावर हल्ला करताहेत. ही बाब चूक आहे की बरोबर आहे, हे तुम्हीच सांगा. अदानींना देशाचं धन देणे, हा संविधानावर आक्रमण करत आहे. भारतातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूपदी 'आरएसएस'च्या सदस्यांना बसवून आक्रमण करत आहेत. निवडणूक आयोग, न्यायसंस्थेवर हल्ला करणे म्हणजे संविधानावर आक्रमण करत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

संविधान म्हणजे भारत, संविधान म्हणजे भारतीयांचा आवाज. संविधान नष्ट करणाऱ्यांना काय म्हणाल, त्यांना गद्दार म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे संविधानावर आक्रमण करत आहे. त्यांनी देशाची संपत्ती अदानी आणि अंबानी यांना वाटली. त्यांनी देशातील संस्था नष्ट केल्या. मतचोरी केली. मी कधीही माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गद्दार आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT