gujarat shocking  Saam tv
देश विदेश

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

gujarat shocking : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवल्याची घटना घडली. त्यतानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य सेपवलं.

Vishal Gangurde

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याच्या पुतण्याकडून केली पत्नीची हत्या

हत्या केल्यानंतर अधिकाऱ्यानेही आत्महत्या केली

दोघांचं लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झालं होतं

या प्रकरणी पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू

गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्याचा पुतण्या आणि मेरीटाईम विभागातील अधिकाऱ्याने पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं आहे. दोन महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. किरकोळ वादातून पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशराज सिंह गोहिल असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यशराज हा क्लास -१ अधिकारी होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्तिसिंह गोहिल यांचा पुतण्या होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज आणि त्याची पत्नी राजेश्वरी गोहिल याचं बुधवारी रात्री घरात वाद झाला. रशराज सिंह याने बंदुकीने पत्नी राजेश्वरीची गोळ्या झाडून हत्या केली.

यशराजनने हेल्पलाइन १०८ क्रमांकावर फोन करून मदत मागतिली. त्यानंतर मदतीसाठी पोहोचलेल्या डॉक्टरांनी पत्नी राजेश्वरीला मृत घोषित केले. त्यानंतर यशराज सिंहने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. यशराज सिंहचा जागीच मृत्यू झाला.

यशराज सिंह गोबिल हा गुजरात मेरीटाईम विभागात अधिकारी होता. त्याने युपीएससी परीक्षेची तयारी देखील करत होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांमध्ये नेमकं कशावरून भांडण झालं, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी यांनी म्हटलं आहे की, 'खूपच दु:खद दुर्घटना घडली आहे. यशराज चांगला युवक होता. स्पर्धा परीक्षा पास होऊन चांगल्या पदावर पोहोचला होता. त्याने इतकं धोकादायक पाऊल का उचललं, याविषयी काही सांगू शकत नाही'

मनीष दोषी यांनी पुढे म्हटलं की, 'काँग्रेस नेते शक्तिसिंह यांच्या कुटुंबासाठी फारच दु:खद घटना आहे. त्यांचा पुतण्या आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री दोघे नवरा-बायको नातेवाईकाच्या घरी जेवायला गेले होते. दोघे आनंदात देखील होते. काही दिवसांपूर्वी मेरीटाईम विभागात नोकरीला लागला होता. त्याला बंदूक ठेवण्याची आवड होती. त्याच बंदुकीने आयुष्य संपवलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १९ बाटल्या बिअर आणि दोन मित्र...; पार्टी गाजवली, मात्र 'ती' एक चूक महाग पडली, दोघांची जीवनयात्रा संपली

मोठी बातमी! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचे? निकाल लवकरच... अंतिम सुनावणी कधीपासून... VIDEO

Maharashtra Live News Update: बीडच्या विद्यार्थिनीचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

खबऱ्यांकडून टीप मिळाली, हायवेवर ट्रक अडवून झडती घेतली; बिश्नोईला बेड्या ठोकल्या! नेमकं काय घडलं?

ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

SCROLL FOR NEXT