प्रसिद्ध अभिनेत्याचा MMS व्हिडिओ व्हायरल? सिनेसृष्टीत खळबळ

ajaz khan viral video : प्रसिद्ध अभिनेत्याचा MMS व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
ajaz khan viral news
ajaz khan viral videoSaam tv
Published On
Summary

'बिग बॉस' फेम अभिनेता वादाच्या भोवऱ्यात

एजाज खानचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल

कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने सिनेसृष्टीत खळबळ

'बिग बॉस' फेम अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एजाजचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एका सोशल मीडिया एन्फुएन्सरने एजाज खानवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एजाज खानचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. एजाज खानचा व्हायरल होणारा व्हिडिओ खरा आहे का, याविषयी कोणीही दुजोरा दिलेला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एजाज खानसोबत एक महिला दिसत आहे. कोणीही दुजोरा दिला नसल्याने हा व्हिडिओ एआय निर्मित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एजाजचा व्हिडिओ बनावट असल्याचंही बोललं जात आहे. या संपूर्णँ प्रकरणावर एजाज खानने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ajaz khan viral news
वाळू तस्कराच्या रिलने भांडं फुटलं, प्रशासन अॅक्शन मोडवर; थेट कायद्याचा बडगा उगारला

काही दिवसांपासून एजाज खान चर्चेत आहे. दिल्लीची सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर 'फिट वर्षा'ने त्याच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आरोप केले होते. वर्षाने तिचे आणि एजाजचे खासगी इन्स्टाग्रॅम चॅटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर काही मिनिटात व्हायरल झाले होते. एजाज खान हा चॅटमध्ये दिल्लीत वर्षाला भेटण्याविषयी विचारणा करत होता.

ajaz khan viral news
अमेरिकेचा हेकेखोरपणा, जगात युद्ध भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय? VIDEO

खासगी चॅट सोशल मीडियावर व्हायरल करताना वर्षाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, मी एखा बिग बॉस स्पर्धकाचा पर्दाफाश करणार आहे. या चॅट्समध्ये एजाज खान वर्षाला दिल्लीत भेटण्याविषयी बोलत आहे. यावेळी एजाज खानने वर्षाला त्याचा मोबाईल नंबर देखील दिला होता. एजाज खानचा प्रस्ताव वर्षाने नाकारला. या चॅटवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता एजाज खान कथित व्हिडिओमुळे वादात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com