Gita Press Awarded Gandhi Peace Prize Saam TV
देश विदेश

Gita Press Awarded: गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं; काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

Gita Press Awarded Gandhi Peace Prize: जगप्रसिद्ध गीता प्रेसला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

Gita Press Awarded Gandhi Peace Prize: जगप्रसिद्ध गीता प्रेसला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ज्युरीने दिलेल्या निर्णयानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयद्वारे ही घोषणा करण्यात आली. दरम्यान, या निर्णयाचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला आहे. गीता प्रेस गांधी शांतता पुरस्कार देणे म्हणजे सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.  

काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केलं की, "२०२१ चा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर येथील गीता प्रेसला प्रदान करण्यात आला आहे, जे यावर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. अक्षय मुकुल यांचे २०१५ चे उत्कृष्ट चरित्र आहे, ज्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींबद्दल लिहिलं आहे. (Latest Marathi News)

"वादळी संबंध आणि त्यांच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंडांवर त्यांच्याशी सुरू असलेल्या लढाया, या सर्वावर लिखाण आहे. हा निकाल खरं तर फसवणूक करणारा आहे आणि सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार (Award) देण्यासारखा आहे.", असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण

गोरखपूर येथील गीता प्रेसची स्थापना १९२३ साली झाली. गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. १६.२१ कोटी श्रीमद भगवद्गीता पुस्तकांसह १४ भाषांमध्ये ४१.७ कोटी पुस्तके येथे प्रकाशित झाली आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने कधीही पैसे मिळवण्यासाठी आपल्या प्रकाशनांच्या जाहिराती घेतल्या नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गीता प्रेसचे अभिनंदन

पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गीता प्रेसचे अभिनंदन करत एक ट्विट केलं आहे. 'गीता प्रेस, गोरखपूरला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या १०० वर्षात लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

गीता प्रेसने पुरस्कार स्वीकारला, पण...

दरम्यान, गीता प्रेस बोर्डने हा पु्रस्कार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुरस्कारासोबत मिळणारी १ कोटी रुपयांची रक्कम आम्ही स्वीकारणार नाही, असं गीता प्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी तिवारी यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणताही सन्मान न स्वीकारण्याची आमची परंपरा आहे.

सन्मान स्वीकारू पण येणारा पैसा स्वीकारणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. गीता प्रेसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या सन्मानाबद्दल त्यांनी गीता प्रेसच्या वतीने भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. तसेच हा सन्मान मिळणे ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT