New Chief Of RAW: आयपीएस अधिकारी रवी सिन्हा (Ravi Sinha) यांची भारताच्या गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजे 'रॉ'च्या (RAW) नवीन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रवी सिन्हा हे 1988 च्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारने सोमवारी त्यांची नियुक्ती जाहीर केली. रवी सिन्हा यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑपरेशन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या एका आदेशात असे म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रवी सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संशोधन आणि विश्लेषण विंगचे (RAW) सचिव म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. रवी सिन्हा हे सामंतकुमार गोयल यांची जागा घेणार आहेत. सामंतकुमार गोयल यांना सरकारने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे.रवी सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सध्याचे रॉ प्रमुख सामंतकुमार गोयल हे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सामंतकुमार गोयल रॉ प्रमुख असताना अनेक मोहिमा यशस्वी ठरल्या होत्या. ते रॉच्या प्रमुखपदी असताना तिकडे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले होते.
रवी सिन्हा हे मूळचे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहे. रवी सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. 1988 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश केडर प्राप्त केले. 2000 मध्ये जेव्हा तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल भाग वेगळा करुन छत्तीसगड राज्याची निर्मिती केली. त्यावेळी तेव्हा रवी सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड केडरमध्ये गेले.
रवी सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रधान कर्मचारी अधिकारी (PSO) आहेत. हे पद विशेष सचिव दर्जाचे आहे. आता त्यांची पुढील पोस्टिंग रॉमध्ये प्रमुख पदावर असणार आहे. रॉकडे परदेशी गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी असते. कोणत्याही देशाच्या घडामोडींचा भारतावर परिणाम होऊ शकतो. तर त्यावर रॉ लक्ष ठेवते. रॉ राष्ट्रहितासाठी ऑपरेशन्स करते. इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये रॉची स्थापना करण्यात आली होती. रामेश्वर नाम काव हे रॉचे पहिले प्रमुख होते. रॉचे रिपोर्टिंग थेट पंतप्रधानांना असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.