Maharashtra Politics: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा दावा! कोणता नेता प्रबळ दावेदार?

NCP Claims Post Of Leader of Opposition in Legislative Council: मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचं बहुमत असल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv
Published On

Leader of Opposition in Legislative Council: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेतील आकडे बदलले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचं बहुमत असल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, विधानसभा आणि विधान परिषदेत ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असतं, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो असं साधारण समीकरण आहे. विधानसभेत अजितदादा पवार विरोधी पक्षनेते आहेत, कारण विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 54 आहे आणि शिवसेनेचं कमी आहे. (Breaking News)

Maharashtra Politics
Political Survey News: लोकप्रियतेच्या 'शर्यती'त एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी टाकलं मागे, ताज्या सर्व्हेतून आकडेवारी समोर

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटाचा प्रवेश केल्यानंतरत विधान परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ठाकरे गटाचं संख्याबळ कमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेमध्ये माझ्यासह 10 सदस्य संख्या जास्त आहे. शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे. परंतु सदस्य संख्या जास्त असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावं असं माझं मत आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता वरिष्ठ सभागृहात आहे. भाजपला पुरुन उरायचं असेल तर महाविकास आघाडीने त्याच्याकडे हे पद द्यावं असं माझं मत आहे असे मिटकरी म्हणाले. (Latest Political News)

Maharashtra Politics
Kalyan News: भाजप आमदाराच्या आवाजाऐवजी जोडला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, व्हिडिओ व्हायरल

आता विधान परिषदेतील समीकरणं बदल्याने विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेचे आंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आहे. आता या विरोधी पक्षनेते पदावार राष्ट्रवादीकडून दावा केला जातो का हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com