Political Survey News: लोकप्रियतेच्या 'शर्यती'त एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी टाकलं मागे, ताज्या सर्व्हेतून आकडेवारी समोर

Maharashtra Assembly Election Survey : 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून राज्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार असल्याचं समोर आलं आहे.
Political News
Political News Saam TV
Published On

Maharashtra Political News : राज्यातील राजकीय समीकरण शिवसेनेतील फुटीनंतर पूर्णपणे बदललं आहे. या राजकीय घडामोडीचा आगामी निवडणुकीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी की शिवसेना-भाजप युतीचं पारडं जड याचा अंदाज आताच बांधणे थोडं घाईचं होईल.

मात्र 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून राज्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार असल्याचं समोर आलं आहे. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 17 ते 19 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे. (Political News)

Political News
Saamana Editorial : गद्दार ते गद्दारच; महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले, शिवसेना वर्धापनदिनी 'सामना'तून शिंदे गटावर सडकून टीका

'न्यूज एरिना इंडिया' सर्वेक्षणात नेमकं काय?

'न्यूज एरिना इंडिया' सर्वेनुसार विधानसभा 2024 च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर येईल. यावेळी भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळेल असाही अंदाज आहे.

सर्व्हेनुसार, भाजपला 123-129 जागा, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रावादी काँग्रेसला 55-56 जागा, काँग्रेसला 50-53, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17-19 जागा आणि इतर पक्षांना 12 जागा मिळतील असा अंदाज आहे.

ठाकरे गटापेक्षा शिंदे गट सरस

एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष म्हणून समोर येईल. भाजप, इतर आणि अपक्ष आमदारांची संख्या सुमारे 140 असेल म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल. पण त्यांना बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. काँग्रेसला महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा होईल, असाही अंदाज या सर्व्हेतून दिसत आहे. (Latest Marathi News)

Political News
Supriya Sule News: पुण्यातील नागरिकांना कोयता गँगची धास्ती; सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'न्यूज एरिना इंडिया' सर्व्हेनुसार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती आहे. देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%) पसंती दर्शवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com