पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आला. माध्यमांसोबत बोलतानाच ते खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंगाचा थरकाप उडवणारी कर्नाटकमध्ये घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
सी.के रवीचंद्रन असं मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविचंद्रन हे कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या समर्थनार्थ सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषद घेत होते. पत्रकारांच्या प्रश्नांची ते सडेतोडपणे उत्तरे देत होते.
याचवेळी रविचंद्रन यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला. त्यामुळे ते खूर्चीवरून खाली कोसळले. यामुळे पत्रकारपरिषदेत मोठी खळबळ उडाली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी रवीचंद्रन यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सी.के. रविचंद्रन हे काँग्रेसच्या प्रचार समितीचे सदस्य होते. म्हैसूर जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिल्याच्या विरोधात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सीके रविचंद्रन यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष आणि स्थानिक समाजात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत रविचंद्रन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. 'संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी या लढ्यात आमच्यासोबत असलेले रविचंद्रन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना, अशी पोस्ट सिद्धरामय्या यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.