Amit Shah Press Conference  ANI
देश विदेश

Amit Shah: काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी पक्ष; खरगेंच्या आरोपांवर अमित शहा यांचा घाणाघात

Amit Shah Press Conference: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

Bharat Jadhav

काँग्रेस हा संविधान, आंबेडकर आणि आरक्षणविरोधी पक्ष आहे. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी आणून राज्यघटना धिंडवडे उडवले. तसेच काँग्रेसने लष्कराचा अपमान केला. भारताची सीमा तोडून परक्या देशाला हिंमत दिली, असं म्हणत केंद्रीय अमित शहा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांना उत्तर दिलंय.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शहांवर टीका करताना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. शहा यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा अपमान केलाय. पंतप्रधान मोदींनी त्यांचा बचाव करण्याऐवजी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी खरगे यांनी केली होती. त्यानंतर दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदे घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

डॉ. आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून देशातील राजकारण तापले आहे. भाजपने संविधानाचे पालन केले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप मल्लिकार्जुन यांनी केला आहे. त्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर घाणाघाती टीका केलीय. संसदेच्या सभागृहात गौरव यात्रेच्या 75 वर्षांवर चर्चा झाली. परंतु काँग्रेसने यावेळी माझ्या भाषणाचा विपर्यास केला. मी त्याचा निषेघ करतो असं म्हणत शहा यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं.

मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहांवर टीका करताना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. शहा यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा अपमान केलाय. पंतप्रधान मोदींनी त्यांचा बचाव करण्याऐवजी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी खरगे यांनी केली होती. त्यानंतर दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदे घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

आज आपण दूध का दूध पानी का पानी करणयासाठी पत्रकार परिषद घेत आहोत. वास्तविकतेला आव्हान देण्यासारखे त्याच्याकडे काहीही नाही. आता ते माझे भाषणाची छेडछाड करत ते चुकीच्या पद्धतीने पसरवत असल्याचं शहा म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अमित शहा यांना पाठीमागे घेण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. त्यावर शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारने बाबासाहेबांचे पंचतंत्र विकसित केले. नागपुरात दीक्षाभूमी विकसित केली. 19 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधानांनी संविधान दिन घोषित केला. आता जनतेला काँग्रेसची ओळख झालीय. जनता यापुढे त्याच्या खोट्या आणि भ्रमांवर विश्वास ठेवणार नाही.

पंतप्रधान मोदींनी सत्याच्या बाजूने आपले मत व्यक्त केले. आमच्या मते, सत्य स्वतःच समस्यांच्या बाजूने उभे असते. भाजप सर्व कायदेशीर पर्याय शोधत आहे. खरगे यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कदाचित मी देईलही. पण त्यांना 15 वर्षे तिथेच बसावे लागणार आहे, अशी कोपरखळीही शहा यांनी मारली.

आपल्यामुळे अरविंद केजरीवाल संविधान आणि बाबासाहेबांचा आदर करू लागले, ही मोठी गोष्ट आहे. खरगे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करू शकत नाही, असं अमित शहा म्हणाले. किमान खरगे यांनी त्यांची जबाबदारी समजायला हवी होती. तुम्ही किमान काँग्रेसला पाठिंबा दिला नको होता. राहुल गांधींच्या दबावाखाली तुम्ही आंदोलनात सहभागी झालात, असेही शहा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT