Congress Saam tv
देश विदेश

राज्यसभेसाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; माजी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने खेळ बिघडला

congress latest news : तेलंगणामध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग लावली आहे. परंतु माजी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने काँग्रेसचा खेळ बिघडला आहे.

Vishal Gangurde

एमआयएमचे ७ आणि भाजपचे ८ आमदार निर्णायक भूमिका बजावणार

काँग्रेसला एक जागा निश्चित, दुसऱ्या जागेसाठी संघर्ष

अभिषेक मनु सिंघवी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू

राज्यसभेत एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या तेलंगणाच्या दोन जागांवर काँग्रेसची नजर आहे. या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असा विश्वास काँग्रेसला आहे. यादरम्यान केसीआर यांनी एक उमेदवार रिंगणात उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव कोणत्याही बड्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही लढाई अतितटीची होणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप थेट काँग्रेसला आव्हान देण्याची शक्यता कमी आहे. परंतु बीआरएसची नजर भाजप आणि एमआयएमच्या आमदारावर असणार आहे. बीआरएस पक्ष काही आमदारांची मोट बांधण्यात यशस्वी झाल्यास काँग्रेसला राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यास जड जाऊ शकते.

मीडिया रिपोर्टनुसार,तेलंगणा विधानसभेतून एका राज्यसभा जागा जिंकण्यासाठी कमीत कमी ४१ आमदारांचं समर्थन पाहिजे. बीआरएसने ३७ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. तर १० आमदारांनी बंडखोरी करत काँग्रेससोबत गेले आहेत. त्यांचं आमदार अपात्रतेची कारवाई सुरू आहे.

बीआरएसला केवळ ४ आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. बीआरएसकडून इतर पक्षांच्या नेत्यांशी बोलत आहे. काँग्रेसकडे एकूण ६६ आमदार आहेत. त्यांना सीपीआयच्या एका आमदाराचं समर्थन आहे. या निवडणुकीत बीआरएस उतरण्याची शक्यता कमी मानली जात होती. परंतु केसीआर यांनी संधी दिसताच निवडणुकीत एन्ट्री मारली आहे.

तेलंगणामध्ये एमआयएमकडे एकूण ७ आमदार आहेत. तर भाजपकडे एकूण ८ आमदार आहेत. या आमदारांनी समर्थन दिल्यास खेळ बिघडू शकतो. काँग्रेस एक जागा जिंकू शकते. परंतु दुसऱ्या जागा जिंकण्यास अडचणी येऊ शकतात. काँग्रेसमधील दुफळी देखील कारणीभूत ठरू शकते. काँग्रेसकडून एका जागेवर अभिषेक मनु सिंघवी यांना पाठवण्याचा चर्चा सुरू आहे. दुसर्‍या जागेवर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार वी. नरेंद्र रेड्डी आणि निवृत्त न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांची नावे चर्चेत आहे. परंतु बीआरएसच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले

Viral Video: 40 शीच्या महिलेसोबत बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं; रस्त्यावर गर्लफ्रेंडने विचारला जाब

Belly Fat Yoga: रोजच्या अपचन आणि वाढत्या पोटामुळे वैताग आलाय? मग आजपासूनच करा हे पाच योगासन

Bracelet Mangalsutra Designs: ऑफिससाठी खास ब्रेसलेट मंगळसूत्र, हे आहेत 5 ट्रेडीं आणि युनिक पॅटर्न

शिंदेगट आणि भाजपचं बिनसलं, सभागृहात जोरदार राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT