Congress Saam Tv News
देश विदेश

Delhi Election Result : दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व '0'; राजधानीत राहुल गांधींचं गणित चुकतंय कुठं?

Congress Defeat in Vidhansabha Election: २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त जिंकले, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा दिल्ली काबिज करता आली नाही.

Bhagyashree Kamble

राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला सलग दिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे आपच्या पराभवापेक्षा काँग्रेसच्या भोपळ्याची सर्वात जास्त चर्चा राजधानीमध्ये होत आहे. सत्ताधारी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली.

२७ वर्षांनतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेय. तर १० वर्षानंतर केजरीवाल यांच्या आपच्या झाडूचा सुपडा साफ झालाय. २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त जिंकले, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा दिल्ली काबिज करता आली नाही. इतकेच काय तर साधा एक आमदारही निवडून आला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये गणित नेमकं कुठं चुकतेय? त्याचं काँग्रेसकडून सिंहावलोकन व्हायलाच हवं.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं स्वतंत्र विभानसभा निवडणूक लढवली होती. तिहेरी लढतीचा फायदा भाजपला झाला असल्याचं बोललं जात आहे. आप पक्षातील नेत्यांनाही काही जागांवर जबरदस्त फटका बसला आहे. मुख्य म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही नवी दिल्लीत ३,१८२ मतांनी पराभव झाला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकींचा आजवरचा इतिहास पाहता २०१३ सालापासून काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०१३ साली काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत ८ जागांवर काँग्रेसनं आपला गढ राखला होता. २०२० सालीही ६७ जागांवर निवडणूक लढवूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यंदाच्या २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र, यंदाही काँग्रेसला भोपळा मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कंबर कसली होती. दिल्लीकरांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने अनेक आश्वासनं दिली होती. प्यारी दीदी योजना, जीवन रक्षा योजना, महागाई मुक्ती योजना, मोफत वीज योजना आणि बेरोजगार तरूणांना दरमहा ८,५०० रूपये देणार असल्याचं आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचा आणि प्रचाराचा काँग्रेसला काडीमात्र फायदा झालं नसल्याचं चित्र स्पष्ट आहे.

दिल्लीकरांचा विश्वास काँग्रेसवरून का उडाला?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी २०११ साली लोकपाल बिलसाठी उपोषण केलं होतं. त्यावेळी अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला सहभागी झाले होते. केजरीवाल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री यांच्यावर अनेक आरोप केले होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेत आपली जागा तयार केली.

भाजपनं दिल्लीत झेंडा रोवला

२७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. १९९८ साली भाजपची सत्ता होती. सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची दिल्लीवर पकड होती. २०१५ साली दिल्लीला नवा चेहरा मिळाला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी जवळपास १० वर्ष मुख्यमंत्री म्हणून भूषवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत ४८ जागा जिंकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT