Narendra Modi Mother Ai Video  x
देश विदेश

Congress : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! नरेंद्र मोदींच्या आईचा Ai व्हिडीओ बनवल्याने कोर्टाने दिला दणका

Narendra Modi Mother Ai Video : काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओवरुन उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला फटकारले आहे.

Yash Shirke

  • पटना उच्च न्यायालयाचा काँग्रेसला मोठा दणका.

  • नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडीओ काढण्याचे आदेश.

  • काँग्रेसवर भाजप आणि इतरांकडून जोरदार टीका.

Court Verdict : पटना उच्च न्यायालयाने बिहार काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआयने तयार केलेला व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. आज सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत पक्षाला फटकारले. मुख्य न्यायाधीश पी.बी.बजंत्री यांनी काँग्रेस पक्षाला सोशल मीडियावर एआय व्हिडीओ लगेच काढून टाका असे आदेश दिले.

काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा एआय तंत्रज्ञानाने एक व्हिडीओ तयार केला होता. बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मोदींच्या दिवंगत आई स्वप्नात दिसतात. त्या बिहारमधील मोदींच्या राजकारणावर टीका करतात असे दाखवण्यात आले.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. फक्त भाजपच नाही, इतरांकडूनही काँग्रेसवर टीका करण्यात आली. भाजपने या व्हिडीओला लज्जास्पद म्हटले. व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या आईचा अनादर दिसून आलेला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, जेडीयू नेते नीरज कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उच्च न्यायालयाने पंतप्रधानांच्या दिवंगत आईचा नक्कल केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. संविधान संकटात आहे असे म्हणणाऱ्यांसाठी हा आरसा आहे. जर संविधान आणि न्यायव्यवस्था असेल, तर एखाद्याच्या आई किंवा वडिलांबद्दल अशा आक्षेपार्ह टिप्पण्या करणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील मनपाच्या मल:निस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती

Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jewellery Cleaning: दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक; काही मिनिटांत चमचम करेल सोन्याचा हार

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT