7.4 magnitude earthquake in Colombia death toll and missing people Saam TV
देश विदेश

भूकंपाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं; १३० हून अधिक जणांचा मृत्यू, २००० जण बेपत्ता; भीषण दृश्यांनी जग सुन्न

Colombia 7.4 magnitude earthquake death Toll : कोलंबियाच्या पश्चिम भागाला ७.४ तीव्रतेच्या भीषण भूकंपाचा धक्का बसला. शेकडो इमारतींचे नुकसान झाले असून १३० हून अधिक जणांचा मृत्यू आणि २ हजारांहून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

7.4 magnitude earthquake in Colombia death toll and missing people : दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देश भीषण भूकंपाच्या झटक्यांनी पार उद्ध्वस्त झाला आहे. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या अतिविनाशकारी भूकंपाने कोलंबियाचा संपूर्ण पश्चिम भाग हादरवून सोडला आहे. या भीषण आपत्तीने संपूर्ण देशाची दाणादाण उडवली आहे. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १३० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २,००० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

डोळ्यांदेखत टोलेजंग इमारती पत्त्यासारख्या कोसळल्याचे थरारक आणि हृदयद्रावक व्हिडिओ समोर आले आहेत. त्या भीषण दृश्यांनी संपूर्ण जग सुन्न झाले आहे. सध्या प्रभावित भागात युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे.

7.4 magnitude earthquake in Colombia

या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ११० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डोळ्यांदेखत कोसळल्या टोलेजंग इमारती; दृश्यांनी थरकाप उडाला

भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिमेकडील चोको परिसरातील 'सैन जोसे डेल पाल्मार' जवळ जमिनीखाली सुमारे १०७ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे झटके इतके भीषण होते की, पेरेरा, कॅली आणि मानिझालेस या मोठ्या शहरांमध्ये टोलेजंग इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओंमध्ये चालता चालता विमानतळाचे छत कोसळताना, स्टेडियमची भिंत ढासळताना आणि प्रसिद्ध मानिझालेस चर्चचा उंच मनोरा खाली कोसळताना दिसत आहे.

तासाभरात सलग धक्के; विमानतळ बंद, वाहतूक ठप्प

मुख्य भूकंपानंतर २.८ ते ४.८ तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक्स (भूकंपाचे पाठोपाठ बसणारे धक्के) बसल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी पेरेरा, क्विबडो, आर्मेनिया, कॅली आणि मानिझालेस या प्रमुख ६ विमानतळांवरील उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत. भूकंपाचे तीव्र धक्के शेजारील इक्वाडोर, पानामा आणि व्हेनेझुएला देशांमध्येही जाणवले आहेत.

युद्धाच्या पातळीवर मदत व बचाव कार्य

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपतींनी बाधित भागात तातडीने आणीबाणी घोषित करत सैन्याला आणि मदत पथकांना बचाव कार्यासाठी रवाना केले आहे. मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघ (UN) आणि अमेरिकेसह अनेक आंतरराष्ट्रीय देशांनी कोलंबियाला तातडीने मदत पुरवण्याची घोषणा केली आहे. दशकातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याने कोलंबियावर मोठे संकट ओढवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; ४ तरुणांचा मृत्यू

Dark knuckles: कोपर आणि गुडघे काळे पडलेत? याचं कारण फक्त घाण नाही; ‘या’ गंभीर समस्या असू शकतात

मेंदू सुपरफास्ट होण्यासाठी सकाळी चहा-कॉफीऐवजी प्या 4 हेल्दी ड्रिंक्स

Accident : साताऱ्यात मध्यरात्री भयंकर अपघात, महागड्या कारचा चक्काचूर, पुण्यातील ४ मित्रांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

Dharashiv Fort : २६ बुरुज अन् अभेद्य तटबंदी, धाराशिवच्या इतिहासाची पाने उलगडणारा 'हा' किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT