Punjab News Social media
देश विदेश

Punjab News: महिलेला बिल देणं कॉफी कंपनीला पडलं महागात; ५ रुपयाचा पेपर कप पडला ११,००० रुपयात

Paper Cup: मोहालीच्या पंसी सिंग सोनी यांनी तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ डिसेंबर २०२० रोजी तिने दुपारी १२.२५ च्या सुमारास चंदीगड येथील सेक्टर ३५ येथील एका मोठ्या कॉफीच्या दुकानात गेल्या. तेथे त्यांनी हॉट चॉकलेटची ऑर्डर दिली. त्याचं बिल २३० रुपये झालं होतं.

Bharat Jadhav

Coffee chain Pay For Paper Cup :

मोहालीच्या एक महिलेला बिल देणं कॉफी कंपनीला चांगलंच महागात पडलं. एका मोठ्या कॉफी चैन कंपनीला ५ रुपयांच्या कपामुळे ११ हजार रुपयांचा भुर्दंड भरावा लागलाय. मोहालीच्या पंसी सिंग सोनी ह्या १८ डिसेंबर रोजी २०२० रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास चंदीगड येथील सेक्टर ३५ येथील कॉफीच्या दुकानात गेल्या. तेथे त्यांनी हॉट चॉकलेटची ऑर्डर दिली. त्याच बिल २३० रुपये झालं. बस बिल पाहून महिलेचा पारा चढला आणि तिने कॉपी कंपनीच्याविरुद्धात तक्रार दाखल केली.(Latest News)

याचं कारण म्हणजे कॉपीच्या दुकानाने महिलेकडून पेपर कपचेदेखील पैसे घेतले. महिलेनं याचीच तक्रार केलीय. सोनी यांनी सांगितले की, बिलानुसार कॉफीसोबत दुकानदाराने त्यांच्याकडून पेपर कपसाठी ५ रुपये सुद्धा घेतले. तक्रारकर्त्या महिलेने पेपर कपसाठी ५ रुपये देण्यास विरोध केला, परंतु दुकानाने त्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सोनी ह्यांनी चंदीगडच्या ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, तक्रारीला उत्तर देताना कॉफी कंपनी लिमिटेडने म्हटलं की, कॅफेने ग्राहाककडून कपसाठी घेतले नाही तर ते टेकवेसाठी होते. त्यामुळे पॅकेजिंग साहित्यासाठी अतिरिक्त खर्च होत असतो म्हणून त्या उद्देशाने ते पॅकेजिंग शुल्क घेणं हे पूर्णपणे न्यायिक आहे. संबंधित महिलेने तक्रार ही जाणून-बुजून केलीय. ज्यामुळे कॅफे दुकानाचं नाव खराब होईल. महिलेने आपला भाऊ आणि वडिलांसोबत कट रचत कॅफेविरुद्धात खोटी तक्रार करत ते खंडणी मागत असल्याचा आरोप कॅफेच्या व्यवस्थापकाकडून उत्तरात करण्यात आला.

यावर सुनावणी देताना आयोगाने सांगितले की, कॉफी कंपनी लिमिटेडच्या वकिलांनी त्यांचा दोष मान्य केला आहे. यामुळे कॉफी कंपनीने गरीब रुग्ण निधीमध्ये १०,००० रुपये जमा करावेत आणि तक्रारकर्त्या महिलेला रु. १,००० द्यावेत, जे आमच्या दृष्टीने पुरेसे असल्याचं आयोगाने म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT