Gas Price Hike News Latest Update  SAAM TV
देश विदेश

CNG Price Hike : वाहन चालकांच्या खिशाला बसणार झळ, १४ महिन्यात तब्बल ७५% दरवाढ; काय आहे कारण?

सीएनजी कार चालकांच्याही खिशाला मोठा फटका बसणार आहे.

वृत्तसंस्था

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने नागरिक चांगलेच हैराण झाले असतानाच सीएनजी कार चालकांच्याही खिशाला मोठा फटका बसणार आहे. कारण राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा सीएनजी दर वाढ झाली आहे. जर तुम्हीही सीएनजी (CNG) वाहने चालवत असल्यास तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे. आजपासून दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. आता दिल्लीत सीएनजीची किंमत 79.56 प्रति किलो आहे. हे नवीन दर 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. (CNG Price Hike News)

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ९५ पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दिल्लीत सीएनजी 78.61 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता, तो आता वाढून 79.56 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी, सीएनजीच्या किमतीत बदल 8 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत सीएनजीच्या दरात किलोमागे तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हा दिल्लीत सीएनजीची किंमत 78.61 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत 86.94 रुपये प्रति किलो आणि नोएडा गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 81.17 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

सीएनजी ७० टक्क्यांहून महाग

रेटिंग एजन्सी इंक्राने नुकताच एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, गेल्या एका वर्षात सीएनजीच्या किमतीत सुमारे 70 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे यंदा नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत 2022-23 या आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर 9 ते 10 टक्के करण्यात आला आहे, तर पूर्वी हे प्रमाण 16 टक्के होते. डिझेल आणि सीएनजीच्या दरात कमी फरक असल्याने आता लोक सीएनजी वाहनांऐवजी डिझेल वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत.

गेल्या 14 महिन्यांत सीएनजीमध्ये झालेली वाढ

याआधी 2021 मध्ये 1 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीत CNG 45.5 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. आज, 17 डिसेंबर 2022 रोजी, सीएनजी 79.56 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. अशा स्थितीत 14 महिन्यांपासून सीएनजीच्या दरात 34.06 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या 14 महिन्यांत सीएनजी 73 टक्क्यांहून अधिक महाग झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनधारकांचे बजेट बिघडले आहे.

किरीट पारीख समितीने स्वस्त सीएनजीसाठी या सूचना दिल्या

गॅसच्या किमतींबाबत स्थापन करण्यात आलेल्या किरीट पारेख समितीने सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. आपल्या शिफारशींमध्ये समितीने सरकारला सांगितले आहे की, नैसर्गिक वायूला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय होईपर्यंत सरकारने सीएनजीवर कमी उत्पादन शुल्क आकारावे. त्यामुळे जनतेला महागड्या सीएनजीपासून दिलासा मिळणार आहे.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT