Yogi Adityanath news  Saam tv
देश विदेश

मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ; ६ नव्या चेहऱ्यांना संधी, कुणाकुणाची लागली वर्णी?

Yogi Adityanath news : उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ६ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या राजकारणात उलथापालथ

उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटमध्ये ६ चेहऱ्यांना मिळाली संधी

Yogi Adityanath Cabinet Expansion: बिहारच्या सम्राट चौधरी सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये दुसर्‍यांदा कॅबिनेटमध्ये विस्तार करण्यात आला आहे. ६ चेहऱ्यांना नव्याने संधी मिळाली आहे.

Uttar pradesh

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ कॅबिनेटमध्ये ६ नवीन मंत्री सामील झाले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा लखनौच्या लोकभवनात आज रविवारी दुपारी ३ वाजता पार पडला. नव्याने शपथ घेणाऱ्या यादीत कृष्णा पासवान, मनोज पांडेय, भूपेंद्र चौधरी, सुरेंद्र दिलेर, कैलाश राजपूत, हंसराज विश्वकर्मा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल आनंदी बेन पटेल यांची काल भेट घेऊन नव्या मंत्र्यांची यादी सोपवली.

सोमेंद्र तोमर आणि अजित पाल यांना बढती

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये राज्यमंत्री तोमर यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पाल यांनाही बढती मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लोधी समाजाचे नेते कैलाश राजपूत, वाल्मिकी समाजाचे नेते सुरेंद्र दिलेर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

एकेकाळी अखिलेश यादव यांचं जवळचे मानले जाणारे मनोज पांडेय यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. सपा सरकारमध्ये मनोज पांडेय मंत्री राहिले आहेत. भाजपचे ब्राह्मण समाजाचे नेते म्हणून पांडेय प्रसिद्ध आहेत. निवडणुकीदरम्यान सपा सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

जाट समाजाचे भुपेंद्र चौधरी यांनाही योगी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. भूपेंद्र चौधरी यांना पश्चिम उत्तर प्रदेशात जाट समाजाचा चेहरा मानलं जातं. आरएसएसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भुपेंद्र चौधरी उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष देखील राहिले आहेत. या व्यतिरिक्त इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील निभावल्या आहेत.

पासी समाजाच्या महिला नेत्या कृष्णा पासवान यांनाही योगी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. भाजपच्या दलित समाजातील महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे नेते मानले जाणारे हंसराज विश्वकर्मा हे ओबीसी समाजातून येतात. हंसराज विश्वकर्मा वाराणसी जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष होते. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देऊन भाजपला ओबीसी, विश्वकर्मा समाजाला मोठा संदेश द्यायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT