Corona Situation In India
Corona Situation In India Saam TV
देश विदेश

Corona Situation In India: मोदींसोबतच्या बैठकीला उद्धव ठाकरेंऐवजी आरोग्यमंत्री हजेरी लावणार - सूत्र

सुरज सावंत

मुंबई : देशात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, पंतप्रधानांसोबतच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या अनुउपस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या बैठकिला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीये (CM Uddhav Thackeray Will Not Attend Meeting Which Taken By Pm Modi On Corona Situation In India).

पंतप्रधान सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना (Corona) च्या परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. यावेळी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या संसर्गाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी आज दुपारी 4.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

देशात 24 तासात 2.47 लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

ओमिक्रॉनमुळे देशात कोरोना (Corona) ची तिसरी लाट वेगाने वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2.47 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनची (Omicron) प्रकरणे देखील 5,588 ने वाढली आहेत. अशा परिस्थितीत नेमका काय निर्णय घ्यावा या पार्श्वभूमीवर आज ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने अनेक राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू आणि मोठ्या मेळाव्यावर बंदी यासह अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

आता आजच्या या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो. निर्बंध आणखी कडक केले जातील की पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार, याकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT