जळगाव : कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट देशात, राज्यात व पर्यायाने जिल्ह्यात तिसरी लाट घेऊन आलाय. परंतु, या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतील बाधितांचा संसर्ग वेग अधिक असला तरी लक्षणे सौम्य असून त्यादृष्टीने शासनाने बाधितांच्या विलगीकरणाचा (Home Quarantine) कालावधी १४ दिवसांवरून ७ दिवसांचा केला आहे. त्यासंदर्भातील ‘प्रोटोकॉल’ जारी करण्यात आला आहे. (jalgaon news corona update news Corona modified protocol Get well within a week)
विलगीकरणाचे दिवस कमी
दुसऱ्या लाटेत लक्षणे तीव्र व रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले. मात्र, विलगीकरणाचा कालावधी २१ वरुन१४ दिवसांवर करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आली तोवर उपचार पद्धती बऱ्यापैकी अवगत झाली असल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले. मात्र, त्यावेळच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटमुळे जीवितहानी मोठी होऊन अगदी तरुणांनाही जीव गमवावे लागले. या गंभीर स्वरूपात नागरिक मात्र १४ दिवसांचा विलगीकरणाचा प्रोटोकॉल पाळत नव्हते.
सात दिवसात रुग्ण होताय बरे
तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron) आल्याचे मानले जात आहे. मात्र, पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत संसर्गदर अधिक असूनही या लाटेतील आजार सौम्य स्वरुपाचा असल्याचे सध्यातरी दिसत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून ती लवकर बरीही होत आहेत. त्यामुळे सरकारनेच या वेळी विलगीकरणासाठी सात दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे दिशानिर्देश दिले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण सात दिवसांच्या आतच बरेही होत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.