Bihar Election Saam tv
देश विदेश

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Bihar Election update : निवडणुकीआधीच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी कारवाई केली आहे. माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना JDU पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मोठी कारवाई

माजी मंत्री शैलेश कुमार यांच्यासह ११ आमदारांना पक्षातून निलंबित

पक्षविरोधी काम आणि शिस्तभंगाच्या कारणास्तव कारवाई

जनता दल युनायटेडचे महासचिव चंदन कुमार सिंह यांच्याकडून अधिकृत पत्र जारी

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीआधीच नीतीश कुमार यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी काम आणि शिस्तभंगाच्या कारणात्सव ११ आमदारांना पक्षातून निलंबित केलं आहे. यामध्ये माजी मंत्री, जमालपूरचे आमदार शैलेश कुमार यांच्या नावाचाही समावेश आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल युनायडेटकडून पक्षविरोधी काम आणि शिस्तभंगाच्या आरोपाअंतर्गत काही नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता दल युनायटेडने एक पत्र जारी करत याविषयी माहिती दिली. प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी हे पत्र जारी केलं आहे.

कोणाला पक्षातून निलंबित केलं?

शैलेश कुमार- माजी मंत्री, जमालपुर, मुंगेर

संजय प्रसाद, चकाई, जमुई

श्याम बहादुर सिंह, बडहरिया, सीवान

रणविजय सिंह, बड़हरा, भोजपुर

सुदर्शन कुमार, बरबीधा, शेखपुरा

अमर कुमार सिंह, साहेबपुर कमाल, बेगूसराय

डॉ. आसमा परवीन, महुआ, वैशाली

लब कुमार, नवीनगर, औरंगाबाद

आशा सुमन, कदवा, कटिहार.

दिव्यांशु भारद्वाज, मोतिहारी, पूर्वी चम्पारण.

विवेक शुक्ला, जिरादेई, सीवान

निलंबित केलेल्या नेत्यांनी पक्षाच्या विचारधारेविरुद्ध काम केलं, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचं पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या निर्णयामुळे पक्षात सुधारणा होतील. तसेच आगामी निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, असंही पक्षाचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT