Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam Tv
देश विदेश

Ekanth Shinde : 'उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांच्या योजना बंद केल्या'; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Shivaji Kale

CM Eknath Shinde News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांच्या फैरी झडत आहेत. आज, सोमवारी हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरून चांगलेच कान टोचले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा सीमावादावर हस्तक्षेप केला. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होऊ नये'.

'त्यांनी तर सीमावासियांच्या योजना बंद केल्या. मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळं इतर लोकांनी शिकवण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांवर देखील भाष्य केलं. 'अब्दुल सत्तार प्रकरणाची माहिती घेऊ. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रकरणाची माहिती घेऊ. विरोधी पक्षाचीही माहिती घेऊ. त्यानंतर सत्ताधाऱ्यांची माहिती घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच सुनावलं. 'नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

'बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT