Winter Session 2022: अब्दुल सत्तारांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा; अजित पवारांची मागणी

Abdul Sattar Vs Ajit Pawar News: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं आहे.
Abdul Sattar Vs Ajit Pawar
Abdul Sattar Vs Ajit PawarSaam TV
Published On

Maharashtra Assembly Winter Session 2022 : राज्याच्या हिवाळी अधिवेशानाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सरकार आणि विरोधक यांच्यात खटके उडाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं आहे. हे सरकार आल्यापासून कृषीमंत्र्यांचं बेताल वक्तव्य वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओसडीएलाही त्यांनी शिवराळ भाषा वापरली याशिवाय महिलांबद्दल बेताल वक्तव्याचे त्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा राजीमाना घ्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Abdul Sattar Vs Ajit Pawar
MP Rahul Shewale: मला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचे पाकिस्तान, दाऊदशी संबंध; खासदार शेवाळेंचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

अजित पवार म्हणाले, दहा पेक्षा जास्त असलेल्या तालुक्यांना वेगळं पॅकेज आणि दहा पेक्षा कमी असलेल्यांना वेगळं पॅकेज. कृषीबाबत जो कार्यक्रम सत्तारांनी घेतला ती लुबाडणूक सुरू आहे. कृषी मंत्री सत्तेत आल्यापासून बेताल वक्तव्य करत आहेत. को्ट्यवधींचा घोटाळा सत्तारांनी केला आहे. आम्ही अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्द् अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून दोन्ही राज्य आपली बाजू मांडत आहेत. कर्नाटक सरकार आपल्या भूमिकवर ठाम आहेत. पण महाराष्ट्र सरकार काहीही पाऊले उचलत नाही. तिथे मराठी कमी आणि कानाडी सक्तीची केली जात आहे. सीमा भागातील नागरिकांवर पावलो-पावली अन्याय केला जात आहे. आज दुपारी किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सरकार ठराव मांडतं का ते पाहू असं अजित पवार म्हणाले. (Maharashtra Political News)

Abdul Sattar Vs Ajit Pawar
Best Shopping Malls in Navi Mumbai : नवी मुंबईतील बेस्ट शॉपिंग मॉल्स

तो भाग केंद्रशासित करावा : उद्धव ठाकरे

दरम्यान सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच सुनावलं. नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com