दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दारू धोरणातील घोटाळ्याप्रकरणी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. यासाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ईडीच्या नोटीसीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ईडीची नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ईडीने भाजपच्या इशाऱ्यावर नोटीस पाठवली असून मला ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करता न यावा यासाठी भाजपने रचलेलं हे षडयंत्र आहे, असा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
त्याचबरोबर ईडीने ही नोटीस तातडीने मागे घ्यावी, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस आल्यानंतर 'आप'चे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप जाणून बुजून आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप 'आप'च्या नेत्यांकडून केला जात आहे.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असताना, आप सरकारमधील आणखी एका मंत्र्यांच्या घरी EDने छापेमारी सुरू केली आहे. केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.
राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित इतर 9 ठिकाणीही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. नेमकं कोणत्या प्रकरणात ही कारवाई सुरू आहे याची गुप्तता पाळण्यात आली आहे. यापूर्वी आपचे 2 मोठे नेते जेलमध्ये गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.