Jammu Kashmir Cloudburst Saam Tv
देश विदेश

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Jammu Kashmir Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी पुन्हा ढगफुटी झाली. कठुआ जिल्ह्यात दोन ठिकाणी ढगफुटी झाली यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.

Priya More

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली होती यामध्ये ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर २०० जण बेपत्ता झाले होते. याठिकाणी अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. ही ढगफुटीची घटना ताजी असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटीत होऊन ७ जणांचा मृत्यू झाला आणि ६ जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरातील घाटी गावाजवळच्या दोन ठिकाणी घडली. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे घाटी गावाचा संपर्क तुटला. ढगफुटीची माहिती मिळताच पोलिस आणि एसडीआरएफ यांचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांसह मदत आणि बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या ढगफुटीमध्ये ६ जण जखमी झाले आहेत. जखमींनाजवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीची भीषण घटना घडली होती. यामध्ये ६० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे बहुतेक जलाशयांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. उझ नदी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि लोकांना जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तर, कठुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बगड आणि चांग्रा गावांमध्ये आणि लखनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या. पण या ठिकाणी कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT