
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील पद्दार ताशोती येथे ढगफुटीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली.
या आपत्तीत ३० जणांचा मृत्यू झाला असून १२० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून बाधितांना मदत पुरवली जात आहे.
Jammu Kashmir Kishtwar Cloudburst : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार ताशोती भागात ढगफुटीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय १२० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून अनेकजण अडकल्याचे म्हटले जात आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
श्रीनगरच्या हवामान विभागाने पुढील ४ ते ६ तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा श्रीनगर हवामान केंद्राने दिला आहे. पूरपरिस्थितीमुळे लंगरची शेड वाहून गेल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी लष्कर आणि एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांना बचाव कार्यासंबंधित निर्देश दिले आहेत. किश्तवाडमध्ये ढगफुटीच्या घटनेवर सिन्हा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शोकाकुल कुटुंबांना संवेदना आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना. नागरी, पोलिस, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य बळकट करण्याचे आणि बाधितांना सर्व शक्य मदत पुरवण्याचे निर्देश दिले, अशी पोस्ट मनोज सिन्हा यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 'जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील ढगफुटी आणि पुरग्रस्तांबरोबर माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमार्फत म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.