Cloth Merchant Shot Dead Saam tv news
देश विदेश

Shocking Crime: बड्या व्यापाऱ्याला घेरलं अन् १०-१२ गोळ्या झाडल्या; लॉरेन्स गँगनं घेतली हत्येची जबाबदारी

Lawrence Gang Behind Abohar Shooting: पंजाबमधील अबोहर येथे कापड व्यावसायिक संजय वर्मा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स गँगने जबाबदारी स्वीकारली असून पोलीस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

बिहारमध्ये एका व्यावसायिकाची भररसत्यावर गोळीबार करून हत्या केल्यानंतर आता पंजाबमधूनही धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अबोहर शहरात सोमवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी कापड व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केली. व्यापाऱ्याच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुकानाबाहेर गाडीतून उतरत असताना ही हत्या करण्यात आली. लॉरेन्स गँगने पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

संजय वर्मा असे कापड व्यावसायिकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी दुकानाबाहेर गाडीतून बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी कारमधून पळून जात असल्याचं दिसून येत आहे. सध्या माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला.

घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'कापड व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय वर्मा यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांची हत्या सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. दुकानाबाहेर ४-५ आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल', अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर वर्मा यांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला. तसेच पोलिसांवर रोष व्यक्त केला. दिवसाढवळ्या गोळीबार होत आहे, पोलीस पूर्णपणे अपयश ठरले आहेत, असं वर्माच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. आरोपींनी वर्मा यांच्यावर १० ते १२ गोळ्या झाडल्याची माहिती आहे. लॉरेन्स गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

आरजू बिश्नोई नावाच्या एका माजी हँडलरकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. 'जय श्री राम.. सर्व भावांना राम राम.. मी गोल्डी ढिल्लो, आरजू बिश्नोई आणि शुभम लोनकर अबोहरमध्ये झालेल्या हत्येच जबाबदारी घेत आहोत', या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये तुफान हाणामारी; मान धरली अन् पाठीत बुक्क्यांचा मार, VIDEO व्हायरल

Beed News: बीडमध्ये गुन्हेगारी संपेना, व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, मित्रानेच छाटली तरुणाची बोटं|VIDEO

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील महिला रुग्णालयात शिरला साप

Maharashtra Politics: महाराष्ट्रात 'कुछ तो बडा होने वाला है'; राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचा अर्थ काय?

Pati Patni Aur Panga: 'पति पत्नी और पंगा'मध्ये झळकणार हे फेमस कपल

SCROLL FOR NEXT