railway track canva
देश विदेश

सारखा गावभर फिरत राहतोस; वडील मुलावर संतापले, बारावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

madhya pradesh shocking news : मुलगा अभ्यास करत नसल्याने ओरडल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

वडिलांनी ओरडल्याच्या मुलगा घरातून निघून गेला

दुपारी रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातून धक्कादायक घटना घडली आहे. वडील ओरडल्याने मुलाने आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आलं आहे. या विद्यार्थ्याच्या शरीराचे रेल्वे ट्रॅकवर दोन तुकडे सापडले. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्याने सोमवारी दुपारी आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. त्याने बरगवा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीसमोर उडी मारून आयुष्य संपवलं. इयत्ता बारावीमध्ये शिकणारा हा विद्यार्थी मनिहारी गावात राहणारा होता. सन्नी गौड बैसवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

सन्नीने आज सकाळी अभ्यास न केल्याने त्याचे वडील ओरडले. वडील ओरडल्याने सन्नी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. मात्र, सन्नी आत्महत्येसारखं पाऊल उचलेल, असे कोणालाही वाटत नव्हते.

सन्नीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या सन्नीने आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणानंतर त्याच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. परीक्षेच्या तणावामुळे देखील आत्महत्या केली असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येने सन्नी राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

सन्नीच्या आत्महत्येनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पालकांनी त्यांच्या मुलांवर अनावश्यक दबाव टाकू नये, अशाही प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर मुलांवर वाढणारा परीक्षेचा तणाव गंभीर विषय असून या विषयावर समाजातील लोकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचाही भावना स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. सन्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT