सीजेपी आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे
अभिजीत दीपकेसह सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका
सीजेपी आंदोलनातील नेत्यांना दंडाधिकाऱ्यांकडून दिलासा
अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलिसांकडून सुटका
सीजेपीच्या आंदोलनादरम्यानची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेसह तिन्ही नेत्यांची पोलिसांनी सुटका केली. तिन्ही नेते हमीपत्र घेऊन पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. दिल्लीमध्ये आंदोलन करण्यापूर्वी विमानतळावर दाखल होताच अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज या तिघांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. दंडाधिकाऱ्यांनी या तिघांना सोडण्याचे आदेश दिले. आता सीजेपीच्या आंदोलनाचे पुढे काय होणार? आंदोलन सुरू राहणार की थांबवण्यात येणार? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेले अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले होते. तब्बल २२ तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. आज सकाळी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर तिघांनाही सोडण्यात आले. महत्वाचे म्हणजे, प्रतिबंधात्मक अटक ही शिक्षा म्हणून केलेली कारवाई नसून गुन्हा घडण्याच्या शक्यतेमुळे केलेली अटक आहे. संभाव्य गुन्हा टाळण्यासाठी पोलिसांकडून अशी कारवाई केली जाते. अभिजीत दीपके आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सीजेपी नेते अजिंक्य शिंदे आता या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी दावा केला की, विद्यार्थी, नागरी समाजाचे सदस्य आणि राजकीय व्यक्तींसह १५,००० हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजिंक्य शिंदेने सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आणि सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेण्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सीजेपीच्या तिन्ही नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर कुणाबद्दल काहीच सांगण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले होते. अजिंक्य शिंदेने रविवारी जंतर मंतरवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.