दिल्लीतील आंदोलनाचे देशभरात पडसाद, बिहारपासून केरळपर्यंत आंदोलनांचा भडका, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी GEN Z रस्त्यावर

Student Protests Across India After Delhi Lathicharge: दिल्लीतील आंदोलनाचे आता देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांमध्ये आंदोलन पेटलंय पाहूयात हा रिपोर्ट......
NATIONWIDE STUDENT PROTESTS AFTER DELHI LATHICHARGE | DEMAND FOR DHARMENDRA PRADHAN RESIGNATION
NATIONWIDE STUDENT PROTESTS AFTER DELHI LATHICHARGE | DEMAND FOR DHARMENDRA PRADHAN RESIGNATIONsaam tv
Published On

जंतरमंतरवरील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातलं राजकीय वातावरण तापलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आता राज्या-राज्यांमध्ये आंदोलनांचा भडका उडालाय. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी देशातील विविध राज्यांत आंदोलनं करण्यात येत आहेत.

देशभरात पडसाद

महाराष्ट्र

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विद्यार्थी सातत्यानं आंदोलन करत आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं.

देशभरात पडसाद

बिहार

NEET पेपरफुटीप्रकरणी बिहारची राजधानी पाटणामध्ये विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे पाटण्यात मोठा तणाव निर्माण झाला. इतकंच नव्हे तर दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपही एकमेकांसमोर आले.

देशभरात पडसाद

आंध्र प्रदेश

आंध्रप्रदेशातील विजयवाडामध्ये भाजपनं काँग्रेस कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन केल्यानं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रतिकार केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

हैदराबाद, तेलंगणा

पंतप्रधान निवासस्थानी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांनी 'चलो लोक भवन' आंदोलन केलं.

वायनाड, केरळम

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी कल्पेट्टा येथे तरुणांनी कँडललाईट मार्च काढला. आंदोलकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तरुणांनी मेणबत्त्या पेटवल्या.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांसह विरोधकही एकवटले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढत चाललाय. आता देशभरात पेटलेल्या या आंदोलनांमुळे तरी मोदी सरकार प्रधानांचा राजीनामा घेणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com